Delhi Woman Car Scooty Accident: दिल्लीमध्ये अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर राजधानीत वातावरण चांगलंच तापलं आहे. स्कुटीला धडक दिल्यानंतर कारने तब्बल १२ किमीपर्यंत फरफटत नेल्याने तरुणीला आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावर नग्नावस्थेत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर राजधानीत खळबळ माजली असून सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये तरुणीचा मृतदेह कारच्या खाली असतानाही तरुण कार थांबवत नसल्याचं दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार यु-टर्न घेत असल्याचं दिसत आहे. यावेळी कारच्या खाली तरुणीचा मृतदेह दिसत आहे. त्याच ठिकाणी दीपक दाहिया यांचं मिठाईचं दुकान असून ते महत्त्वाचे साक्षीदार आहेत.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Video Woman Requested TTE To Change Train Coach Due To Overcrowding Of Male Passengers
VIDEO: ‘तक्रारींकडे दुर्लक्ष’ हीच तक्रार! गर्दीमुळे कोच बदलण्याची विनंती; टीटीईचं दुर्लक्ष; म्हणाला, ‘मी रेल्वे मंत्री…’
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत

Delhi Woman Accident : “आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते,” दिल्ली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे ‘ते’ ठरले शेवटचे शब्द

दाहिया यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार “मी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी दुकानाच्या बाहेर बसलेला होतो. त्याचवेळी १०० मीटर अंतरावरुन मोठा आवाज ऐकू आला. मला सुरुवातीला टायर फुटला आहे असं वाटलं. पण नंतर कार मृतदेह फरफटत नेत असल्याचं मी पाहिलं. मी तत्काळ पोलिसांना कळवलं”.

दाहिया यांनी आरोपी वारंवार त्याच रस्त्यावर गाडी चालवत होते अशी माहिती दिली आहे. चार ते पाच किमीच्या रस्त्यावर वारंवार गाडी चालवत ते यु-टर्न घेत होते असं त्यांनी सांगितलं आहे. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. जवळपास दीड तास ते मृतदेह फरफटत होते असं त्यांनी सांगितलं आहे.

नोटबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

दाहिया यांनी दुचाकीवरुन कारचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत पोलिसांच्या संपर्कात होते. दीड तासाने मृतदेह बाजूला पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.