scorecardresearch

सुवर्ण मंदिराजवळ तंबाखूचं सेवन करणाऱ्याची निहंग शिखांकडून हत्या, पण सीसीटीव्हीत महिला दिसल्याने गूढ वाढलं

पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराजवळ निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे

सुवर्ण मंदिराजवळ तंबाखूचं सेवन करणाऱ्याची निहंग शिखांकडून हत्या, पण सीसीटीव्हीत महिला दिसल्याने गूढ वाढलं
पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराजवळ निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे

पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराजवळ निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फॅक्टरी कामगार असणारी पाडित व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असल्याने हत्या करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात दोन निहंग शीख होते. मात्र या घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलं असून, यामध्ये हत्येपूर्वी पीडित व्यक्ती एका महिलेशी बोलत असल्याचं दिसत आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.

सीसीटीव्हीत काय दिसत आहे?

नव्याने समोर आलेल्या सीसीटीव्हीत पीडित व्यक्ती हत्येपूर्वी एका महिलेशी बोलत असल्याचं दिसत आहे. दुचाकीवर असणारी ही व्यक्ती महिलेशी बोलण्यासाठी थांबली असता, महिला पुढे जाताना दिसत आहे. तो महिलेकडे पाहतो, मात्र ती दुर्लक्ष करत निघून जाते. यानंतर पुढे गेल्यावर दोघे एकमेकांशी बोलू लागतात.

यावेळी त्यांच्या आजुबाजूने गाड्या आणि लोक जाताना दिसत आहेत. दोन निहंग शीखही तेथून जातात. मात्र काही वेळाने ते मागे येतात आणि दोघांकडे चौकशी करतात. पीडित व्यक्ती दुचाकीवरुन जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते अडवतात. यावेळी पीडित व्यक्ती आणि महिलेत काय बोलणं सुरु होतं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

शाब्दिक वाद होत असताना एक निहंग शीख आपली तलवार बाहेर काढतो. हा वाद सुरु असताना तिथे लोकांनी गर्दी केली होती. काही वेळाने पीडित व्यक्ती आणि निहंग शीख यांच्यात तुंबळ हाणामारी सुरु होती. यादरम्यान, गर्दीतील एक व्यक्ती त्याच्यावर हल्ला करत खाली पाडतो आणि मारहाण सुरु करतो. एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत ही हत्या कैद झाली आहे. पोलिसांनी सकाळी माहिती मिळेपर्यंत, रात्रभर मृतदेह रस्त्यावर पडून होता.

हरमनजीत सिंग असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलीस आयुक्त अरुणपाल सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की, “त्याने तंबाखू आणि मद्याचं सेवन केलं असल्याने निहंग शीखांनी त्याच्यावर हल्ला केला. मंदिरापासून फक्त एक किमी अंतरावर ही घटना घडली आहे”. घटनास्थळी सहा ते सात लोक असताना एकाही व्यक्तीने पोलिसांना फोन केला नाही हे लाजिरवाणं असल्याचं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cctv of a man hacked to death by three men including nihang sikh near the golden temple in punjab amritsar sgy

ताज्या बातम्या