महापालिका अधिकारी असल्याचं सांगत दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना एका सुरक्षारक्षकाने जन्माची अद्दल घडवली आहे. हे चोर एका डिलिव्हरी एजंटची दुचाकी चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत गेट बंद केला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. दिल्लीमधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

स्थानिकांनी एका चोराला पकडलं असून, दुसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. शेजारी असणाऱ्या एका पार्कमध्ये तो लपला होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

हे चोर महापालिका अधिकारी असल्याची बतावणी करत इमारतीत शिरले होते. आपण पाहणी करण्यासाठी आल्याचं त्यांनी एव्हरेस्ट अपार्टमेंटमधील रहिवाशांना सांगितलं होतं. दुपारी २ वाजता त्यांना एक दुचाकी चोरण्याची संधी मिळाली. कुरिअर डिलिव्हरीसाठी आलेल्या तरुणाने दुचाकीची चावी काढलेली नाही हे पाहून दोघेही पुढे सरसावले होते.

संधी मिळताच दोघे दुचाकीवर स्वार झाले आणि पळून जाऊ लागले. यावेळी गेटवर तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकाने डिलिव्हरी एजंटचा आवाज ऐकला. त्याने चोरांना रोखण्यासाठी गेट बंद करण्यास सुरुवात केली. यावेळी वेगाने निघालेले हे चोर दुचाकीसह गेटवर आदळले आणि खाली पडले.

स्थानिकांनी कंट्रोल रुमला फोन करुन माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.