तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी सकाळी लष्कराचे MI17V5 विमान कोसळले. भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ लष्करी अधिकारी उपस्थित होते. या अपघातात चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तिघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सीडीएस बिपिन रावत यांचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१५ मध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.

हा अपघात हेलिपॅडपासून सुमारे १० किमी अंतरावर झाला जेथे ते सीडीएस रावत यांच्यासोबत उतरणार होते. बिपिन रावत हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे कॅडेट संवाद कार्यक्रमात सहभागी होणार होते.

ही घटना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. त्यावेळी बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले नव्हते. बिपिन रावत यांची २०१६ मध्ये सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस आहेत. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत त्यावेळी नागालँडमधील दिमापूर येथील लष्कराच्या ३-कॉर्प्सच्या मुख्यालयाचे प्रमुख होते. रावत यांनी त्यांच्या चित्ता हेलिकॉप्टरने दिमापूर सोडले होते. पण काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामागे इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, तथापि, सीडीएस बिपिन रावत या अपघातातून बचावले होते. त्यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली होती.

त्यावेळी लष्कराने आपल्या अधिकृत निवेदनात हेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ काही मीटर उंचीवर उडाल्याचे सांगितले होते. यादरम्यान या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरमध्ये काही गडबड झाली आणि दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली वृत्त नाही. या घटनेचीही हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशी केली होती.