केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू असताना कोसळले छत; काँग्रेस नेत्याने ‘हाच विकास आहे’ म्हणत साधला निशाणा

पत्रकार परिषद सुरू असताना खोलीतील छत अचानक कोसळले आणि गोंधळ उडाला.

chhat

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ही पत्रकार परिषद सुरू असताना खोलीतील छत अचानक कोसळले आणि गोंधळ उडाला. अचानक छत कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. छत कोसळल्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षांनी हा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय मंत्र्यांना टोला लगावला.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी म्हटलंय की, होतो “केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यावर विकासाचे ढग बरसले. पत्रकार परिषदेत ते पंतप्रधान मोदींचे गुणगान गात असतानाच ही घटना घडली.”

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत देशभरात उभारण्यात येणाऱ्या ७५ हुनर हाटांच्या मालिकेचा भाग म्हणून १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान रामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘हुनर हाट’ कार्यक्रमाला मुख्तार अब्बास नक्वी यांनी भेट दिली. मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी ट्विट केले की, “तीसहून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ७०० कारागीर हुनर हाटमध्ये सहभागी होत आहेत.”

केंद्रीय मंत्री नक्वी यांनी गुरुवारी हुनर हाटच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार आणि वीर सावरकरांवर विविध राजकारण्यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांसह इतर मुद्द्यांवर भाष्य केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ceiling collapsed during union minister mukhtar abbas naqvis press conference in rampur congress takes jab hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना