scorecardresearch

Premium

रुपयाच्या गटांगळ्या, पण निर्मला सीतारमण म्हणतात, “इतर देशांच्या तुलनेत…!”

रुपयाच्या अवमूल्यनावर बोलताना निर्मला सीतारमण यांनी इतर देशांच्या चलनांचा दिला संदर्भ!

nirmala-sitharaman-5-1

गेल्या काही दिवसांपासून रुपयाचं मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाल्याचं बाजारातील आकडेवारीवरून दिसून आलं आहे. या आठवड्यात गुरुवारी रुपयानं तब्बल ८३ पैशांचं अवमूल्यन नोंदवलं. गेल्या सात महिन्यांतली ही सर्वात मोठी पडझड होती. शुक्रवारीही रुपयानं आपला उलटा प्रवास कायम ठेवला असून तब्बल ३० पैशांनी रुपया पडला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आता रुपयाचं मूल्य थेट ८१.०९ इतकं झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात वेगळी भूमिका मांडत गुंतवणूकदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातली शिखर बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि रुपयाच्या घटत्या दरावर लक्ष ठेवून असल्याचं निर्मला सीतारमण यांनी शनिवारी माध्यमांना सांगितलं. मात्र, इतर देशांच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन कमी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
gold price today
Gold-Silver Price on 30 September 2023: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आज सोन्याच्या १० ग्रॅमचा फक्त ‘इतकाच’ भाव
thackeray faction on canada pm justin trudeau
India-Canada Conflict: “कॅनडा विरुद्ध भारत हा सामना आता..”, हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणी ठाकरे गटानं मांडली भूमिका; मोदी सरकार लक्ष्य!
Gold Silver Price
Gold-Silver Price on 21 September 2023: महिनाभरानंतर सोने पुन्हा ६० हजारांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजचे झटपट दर

“इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.

रुपयाचं आत्तापर्यंतच सर्वाधिक अवमूल्यन झालेलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक बाजूवर लक्ष असून रुपयाच्या बाबतीत आपण चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर चलनांचं अवमूल्यन होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central finance minister nirmala sitharaman on rupee depreciation against american dollar pmw

First published on: 25-09-2022 at 08:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×