पीएम केअर्स फंड ही सार्वजनिक विश्वस्त संस्था ( Public Charitable Trust ) असून या संस्थेची स्थापना संविधान तसेच संसदेने निर्माण केलेल्या कायद्यांतर्गत केलेली नाही, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे. वरीष्ठ वकील श्याम दिवान यांनी पीएम केअर फंडच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी करत एक याचिका दाखल केली होती. याच याचिकेबाबत आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात वरील माहिती देण्यात आली.

हेही वाचा >>> ‘मोदी, शाहांना तुरुंगात टाकू’ म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर चंद्रशेखर बावनकुळे संतापले; म्हणाले “तर राज्यात…”

mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
candidate of Vanchit from Dhule Abdul Rehman demand for voluntary retirement but central government opposed it
वंचितच्या धुळे येथील उमेदवाराची स्वेच्छानिवृत्तीची मागणी, मागणीला केंद्र सरकारचा विरोध
electoral bonds and supreme court
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी सरकारने १० हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली

कोणत्याही सरकारकडून निधी पुरवला जात नाही

या प्रतिज्ञापत्रात पीएम केअर्स फंड सार्वजनिक वित्त संस्थेच्या रुपात स्थापन करण्यात आलेले आहे. पीएम केअर्स फंडची निर्मिती संविधान, लोकसभा तसेच कोणत्याही राज्याच्या विधानसभेअंतर्गत करण्यात आलेली नाही. या ट्रस्टवर कोणत्याही सरकारची मालकी नाही किंवा कोणत्याही सरकारकडून याला निधी पुरवला जात नाही. ट्रस्टच्या कामकाजावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार तसेच कोणत्याही राज्य सरकारचे नियंत्रण नाही, असे या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, जाणून घ्या प्रमुख मुद्दे काय?

याचिकाकर्त्यांचा आक्षेप

पीएम केअर फंडला शासकीय फंड असल्याचे दाखवण्यात आले आहे, असा दावा याचिकाकर्ते वरिष्ठ वकील श्याम दिवान यांनी केला. “देशाचे उपराष्ट्रपतींसारख्या उच्चपदस्थांनी राज्यसभेच्या सदस्यांना पीएम केअर फंडमध्ये दान करण्याचे आवाहन केले होते,” असा दवा श्याम दिवान यांनी केला. तर दुसरीकडे पीएम केअर फंड सार्वजनिक धर्मादाय संस्था असल्याचे म्हणण्यात आले आहे. तसेच या ट्रस्टकडून फक्त स्वैच्छिक दान स्वीकारले जाते. निधी गोळा करण्याचे काम सरकारचे नाही, असे सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे.

हेही वाचा >>> लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; गांधीनगर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

दरम्यान, करोना महासाथीच्या काळात १ एप्रील २०२० रोजी पीएम केअर फंडची स्थापना करण्यात आली होती. करोनासारख्या आपत्तींचा सामना करण्यासाठी या फंडची निर्मिती करण्यात आली होती. या फंडची स्थापना केल्यानंतर कंपन्यांकडून दिला जाणारा निधी सीएसआर म्हणून गृहित धरला जाईल, असे तेव्हा सांगितले होते.