भारत सरकारने व्होडाफोन आयडियाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या व्याज देय रकमेचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे भारत सरकार आता व्होडाफोन-आयडियामध्ये ३३ टक्के भागीदार होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा – Rahul Gandhi letter to PM Modi : “…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता”, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही वर्षांपासून व्होडाफोन-आयडिया कंपनीवर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून व्होडाफोन-आयडियाला स्पेक्ट्रमच्या थकीत व्याजाचे शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव व्होडाफोन-आयडियाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला व्होडाफोन-आयडिया कंपनीत ३३ टक्के भागीदारी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या निर्णयानंतर व्होडाफोन-आयडियाची भागीदारी ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.

हेही वाचा – धर्मातरविरोधी कायद्यांबाबत केंद्र, राज्यांना नोटिसा ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या या निर्णयानंतर व्होडाफोन आयडिया शेअर्सच्या किमतीत १ टक्क्यांनी वाढ झाली होती. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात व्याजाच्या रक्कमेच्या ऐवजी सरकार शेअर्स स्वीकारणार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे बघायला मिळालं होतं.