पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारने  बुधवारी केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) कोलकाता येथील आरजी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालाची सुरक्षा ताब्यात घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह मंत्रालयाने हे निर्देश दिल.

बुधवारी सकाळी उपमहानिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ‘सीआयएसएफ’च्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली. ‘सीआयएसएफ’ या वैद्याकीय महाविद्यालय संस्थेच्या वसतिगृहांना सुरक्षा पुरवेल आणि लवकरच येथे निमलष्करी दलाची सशस्त्र तुकडी तैनात केली जाणार आहे.

रुग्णालयाच्या सभागृहात ९ ऑगस्ट रोजी सकाळी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांसाठी सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी १० सदस्यीय नॅशनल टास्क फोर्सची (एनटीएफ) स्थापना केली आहे.

हेही वाचा >>>Video: एका वर्षाच्या मुलाने खेळणं समजून सापाला चावलं; पुढे झाला अनर्थ, डॉक्टरही हैराण

केंद्राचे पश्चिम बंगाल सरकारला पत्र

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोलकाता येथील आरजी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दल तैनात करण्याची मागणी केली. तसेच हे दल निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचीही सुरक्षा करेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

माजी प्राचार्यांविरुद्ध ईडी चौकशीची मागणी

आरजी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माजी उपअधीक्षकांनी बुधवारी कलकता उच्च न्यायालयात धाव घेत माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध ईडी चौकशीची मागणी केली, त्यांनी राज्य-संचालित सुविधेमध्ये त्यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज यांनी अख्तर अली यांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली.