झायडस कॅडिलाकडे केंद्राची एक कोटी लसमात्रांची मागणी

१२ ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वयोगटातील वापरासाठी आपत्कालीन परवानगी मिळाली.

नवी दिल्ली : झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी या सुईविरहित कोविड लशीच्या १ कोटी मात्रांची मागणी केंद्र सरकारने नोंदवली असून ही लस तीन मात्रांची आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लशीचा समावेश करण्यात येणार आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील ही पहिली डीएनए लस असून ती प्रौढांना दिली जाऊ शकते. १२ वर्षांवरील व्यक्तींसाठीच्या लसीकरणासाठी ‘झायकोव्ह डी’ या लशीला मान्यता देण्यात आली होती.   या लशीची किंमत कर सोडून प्रतिनग ३५८ रुपये  आहे. यात वेदनारहित जेट अ‍ॅप्लिकेटरचा समावेश आहे. त्याच्या मदतीने ही लस दिली जाते.   ही लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.  २८ दिवसांच्या अंतराने या लशीच्या तीन मात्रा द्यायच्या असून दोन्ही हातांवर त्या दिल्या जातील. झायकोव्ह डी लशीला २० ऑगस्ट रोजी आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. मुलांच्या लसीकरणासाठी या लशीचा वापर होणार आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसही २ ते १८ वयोगटासाठी योग्य असल्याचे सांगत भारतीय औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन परवानगी दिली होती. १२ ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वयोगटातील वापरासाठी आपत्कालीन परवानगी मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Centre demands 1 crore doses for zydus cadila covid vaccine zws

ताज्या बातम्या