देशातील भटक्या जमातींना ओबीसीबाहेर आरक्षण देण्याचा विचार सुरू – रामदास आठवले

भटक्या जमाती म्हणजेच भारतातील ‘घुमंतू’ समुदायाला लवकरच इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर आरक्षण मिळू शकते.

RPI, Ramdas Atahavle, Ramdas Athavale, rehab centres, Rehabilitation Centres, रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले

भटक्या जमाती म्हणजेच भारतातील ‘घुमंतू’ समुदायाला लवकरच इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर आरक्षण मिळू शकते. केंद्र सरकार या जमातींना आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. सरकार भटक्या जमातींच्या दुर्दशेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआर इदाते समितीने सादर केलेल्या अहवालाचा विचार करत आहे, असं ते म्हणाले.

“आम्ही अहवालाचा विचार करत आहोत, आणि मंत्रालय या शिफारशींचा बारकाईने अभ्यास करत आहे आणि त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भटक्या जमातींना ओबीसींच्या बाहेर आरक्षण देता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. समितीने सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे, परंतु मंत्रालय अद्याप अहवालाचा अभ्यास करत आहे आणि अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही,” असे आठवले इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

“बालकिशन रंके समितीने देशभरात सर्वेक्षण केले आहे आणि भटक्या जमातींच्या अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. तसेच त्यांची मुलं शिक्षणापासून कशी वंचित राहिली आहेत, याचाही समितीने उल्लेख केला आहे. शिवाय, भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू आहे,” असेही केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Centre looking into separate reservation for nomadic tribes says minister ramdas athawale hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या