scorecardresearch

मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांच्या पगार बजेटमध्ये दुप्पट वाढ, सत्या नडेला यांची मोठी घोषणा

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत ईमेल पाठवला आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बजेटमध्ये दुप्पट वाढ केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नडेला यांचा कर्मचाऱ्यांना ईमेल
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले, की ते त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. बाजारात ‘कंपनीच्या प्रतिभेला खूप मागणी आहे आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात आणि ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करता.


कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार
सत्य नाडेला म्हणाले की, आम्ही आमचे जागतिक गुणवत्ता बजेट दुप्पट करत आहोत. त्याचे फायदे वेगवेगळ्या मार्केट डेटाच्या आधारे बदलतील आणि जास्तीत जास्त वाढ बाजाराची मागणी कुठे आहे यावर अवलंबून असेल. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या ईमेलनंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास नडेला यांनी व्यक्त केला आहे.

अलीकडेच अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ केली होती.
मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आधीच वाढ केली असून यामध्ये अ‍ॅमेझॉनचे नाव अग्रक्रमाने आहे. फेब्रुवारीमध्येच, Amazon ने कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कर्मचार्‍यांस मूळ वेतन दुप्पट केले. ते $१६०,०० वरून $३५०,००० केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ceo satya nadella says microsoft is almost doubling salaries as company attempts to stop great resignation dpj

ताज्या बातम्या