चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरव्यवहारावर ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. सरन्यायाधीशांना पीठासीन अधिकाऱ्यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. पीठासीन अधिकारी मतांमध्ये खाडाखोड करून छेडछाड करत असल्याचे दिसल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या गैरप्रकाराचा निषेध नोंदवला. तसेच ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया चंद्रचूड यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी आज (१९ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी भारतीय जनता पार्टी शहरात पुन्हा मोर्चेबांधणी करत आहे. या सुनावणीपूर्वी आम आदमी पार्टीचे तीन नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा इंडिया आघाडीसाठी मोठा झटका असेल.

भारतीय जनता पार्टी निवडणूक जिंकण्यासाठी गैरव्यवहार करत असल्याचा आरोप होत असतानाच आपचे तीन नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा चालू आहे. एनडीटीव्हीने सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने म्हटलं आहे की, आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. आपचे तीन नगरसेवक भाजपात गेल्याने महापालिकेच्या जागेचं आणि बहुमताचं गणित बदलेल. सर्वोच्च न्यायालयाने चंदीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक नव्याने करण्याचे आदेश दिले तर भाजपाकडे बहुमत असेल आणि चंदीगडमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होईल.

Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
number of people joining the BJP has increased before election
चंद्रपूर : ऐन निवडणूकीत भाजपमध्ये ‘आयाराम’ची संख्या वाढली
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या एक दिवस आधी भाजपा नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ३० जानेवारी रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या कुलदीप कुमार यांना पराभूत करून महापौरपद मिळवलं होतं. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि प्रचंड वादानंतर चंदीगड महापौर पदासाठी ३० जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्याने भाजपाचा विजय झाला होता. भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार सिंग यांचा पराभव केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास भाजपा बहुमत सिद्ध करणार?

केंद्रशासित असलेल्या चंडीगड महालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या (सदस्यसंख्या) ३६ इतकी असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएचे १६, आम आदमी पार्टीचे १३, काँग्रेसचे ७ आणि शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक निवडून आला आहे. तसेच चंदीगडचे खासदारही महापौर निवडणुकीत मतदान करू शकतात. बहुमताची १९ ही जादुई संख्या कोणत्याच पक्षाने गाठली नाही. म्हणजेच कोणाकडेच बहुमत नाही. त्यानंतर इंडिया आघाडीचे घटक पक्ष ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्या दोघांचं संख्याबळ २० झालं. त्यामुळे ‘आप’चा महापौर निवडून येणार ही केवळ औपचारिकता उरली होती. परंतु, चंडीगडमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच गुंडाळून ठेवण्यात आली आणि शहरात भाजपाचा उमेदवार विराजमान झाला. याला काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने जोरदार विरोध केला. तसेच यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागिततली. दरम्यान, आता आपचे तीन नगरसेवक भाजपात गेल्याने भाजपा पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करू शकते.

हे ही वाचा >> कमलनाथ यांच्या पक्षांतराचे गूढ कायम; समर्थकांची दिल्लीत धाव, काँग्रेसकडून चर्चेचे खंडन

तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यास इंडिया आघाडीला मोठा झटका लागू शकतो. असं झाल्यास भाजपासमर्थक नगरसेवकांची संख्या १९ होईल. आप नगरसेवक पूनम देवी, नेहा मुसावट आणि गुरचरण काला यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचं वृत्त एनडीटीव्ह, आज तकने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले तर भाजपात बहुमत सादर करू शकते.