उत्तर प्रदेश पोलिसांनी राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पत्रकार विनीत नारायण आणि अन्य दोघांचा समावेश आहे. नारायण यांनी आपल्या पोस्टमध्ये जमीन हडपल्याच्या प्रकरणात चंपत राय यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अयोध्येत वादग्रस्त जमीन व्यवहारावरून प्रश्नांना सामोरे जात असलेले चंपत राय यांच्या भावाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राय आणि त्यांच्या भावांना बिजनौर पोलीस प्रमुखांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे.

K Kavitha Arrested By CBI
के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”
BJP leader Shobha Karandlaje election commission
बॉम्बस्फोटाप्रकरणी वादग्रस्त विधानावर कारवाई, कोण आहेत ‘या’ भाजपाच्या खासदार?

कुटुंबातील सदस्यांची विनाकारण बदनामी करण्याचे षडयंत्र

नारायण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अल्का लाहोटी यांच्या गोशालेचा तपशील असलेला अर्जही जोडला होता, त्याबद्दल पोलिसांनी नोंद केली आहे. तसेच चंपत राय यांचा भाऊ बंधू सुनील कुमार बन्सल यांच्या म्हणण्यानुसार आपला भाऊ चंपत राय आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची विनाकारण बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच आमचा आणि भाऊ चंपत राय यांचा गोशाला आणि महाविद्यालयाशी काही संबध नाही. राजकारण आणि निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

हेही वाचा- “हे म्हणजे नौटंकी, पोटात अन्न नाही तो योग कसा करेल?”, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे ताशेरे

पोलीस अधिक्षक, डॉ. धरमवीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, नगीना येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चंपत राय यांच्याविरूद्ध फेसबुकवरील टिप्पणी पूर्णपणे निराधार आहेत. त्याच्यावरील आरोप असत्य आहेत. यासह आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चंपत राय यांचे वडिलोपार्जित घर बिजनौरच्या नगीनामधील सरायमरमध्ये आहे. चंपत राय यांनी १९८० मध्ये बिजनौर सोडले. चंपत राय यांना सहा भाऊ आहेत, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच विनीत नारायण नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर चंपत राय यामंच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंपत राय यांचे भाऊ संजय बन्सल यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर विनीत नारायण, अलका लाहौटी आणि रजनीश यांच्याविरूद्ध बिजनौरच्या नगीना पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.