चेन्नईच्या एका १७ वर्षीय मुलांने भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवरील एक बग दूर करण्यात मदत केली आहे. त्या बगमुळे लाखो प्रवासी आणि त्यांची खासगी माहिती उघड झाली असती. पण रंगनाथनच्या सतर्कतेमुळे हा बग लक्षात आला आणि लाखो प्रवाशांची मदत झाली आहे. रंगनाथन हा चेन्नईच्या तांबरम येथील एका खासगी शाळेत शिकतो. ऑनलाइन तिकीट बुक करत असताना त्याला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर एक बग आढळला. या बगमुळे लाखो प्रवासी आणि त्यांची खासगी माहिती उघड होऊ शकली असती.

रंगनाथन सांगतो की, तो “ऑनलाइन तिकीट बुक करत असताना वेबसाइटवरील गंभीर इनसिक्योर ऑब्जेक्ट डायरेक्ट रेफरन्समुळे त्याला इतर प्रवाशांची माहिती मिळाली. ज्यामध्ये इतर प्रवाशांचे नाव, लिंग, वय, पीएनआर क्रमांक, ट्रेनबद्दलची माहिती, जाण्या-येण्याची ठिकाणं आणि प्रवासाची तारीख यासह बरेच तपशील यांचा समावेश होता. तसेच त्याला दुसऱ्यांच्या माहितीमध्ये फेरफार देखील करता येत होतं. या बगमुळे कोणीही इतरांची माहिती मिळवू शकतो, शिवाय त्यात दुसरी माहिती टाकून फेरफार करू शकतो. यामुळे लोकांच्या सुरक्षेसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात,” असं त्याने सांगितलं. 

ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद
Job Opportunities Army Opportunities for Women career
नोकरीची संधी:  महिलांसाठी लष्करातली संधी

रंगनाथनने पुढे सांगतो की, “बॅक एंड कोड सारखाच असल्याने, हॅकर दुसऱ्या प्रवाशाच्या नावाने जेवणाची ऑर्डर देऊ शकतो, बोर्डिंग स्टेशन बदलू शकतो आणि प्रवाशाच्या माहितीशिवाय त्याचं तिकीट देखील रद्द करू शकतो. महत्वाचं म्हणजे यामुळे लाखो प्रवाशांच्या डेटाबेसमध्ये फेरफार होऊ शकतो तसेच डेटाबेस लीक होण्याचा धोकाही आहे.”

आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रंगनाथनने ३० ऑगस्ट रोजी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला या प्रकरणाची तक्रार केली होती आणि आयआरसीटीसीला सतर्क करण्यात आले होते. त्याच्या तक्रारीनंतर पाच दिवसांत हा बग दूर करण्यात आला.” दरम्यान, रंगनाथनने यापूर्वी संयुक्त राष्ट्र, नायकी आणि इतर अनेक वेबसाईटवरील बग लक्षात आणून दिले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं होतं.