चेन्नईत एका संशयित सोनसाखळी चोराचा पोलिसांनी ड्रोनद्वारे छडा लावत त्याला गोळ्या घातल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. यासाठी पोलिसांनी ३०० पोलीस कर्मचारी आणि ड्रोनची मदत घेतली. दोघेही संशयित झारखंडचे रहिवासी आहेत. त्या दोघांनी पोलिसांवर गोळी झाडल्याने प्रत्युत्तर दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोनसाखळी चोरी व्यतिरिक्त या दोघांचा इतर गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुर्थसा असं २५ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव असून अख्तर या २८ वर्षीय साथीदाराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्थासाने श्रीपेरुम्बुदुर टोल प्लाझाजवळ बसची वाट पाहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेल्या गळ्याची सोनसाखळी लांबवली. यावेळी त्याच्यासोबत नईम अख्तर होता. महिलेने आरडाओरड केल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या पाठलाग केला. मात्र प्रत्युरात त्यांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. या घटनेनंतर कांचीपुरम जिल्हा अधीक्षकांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक टीम गठीत केली. तसेच ड्रोनची मदत घेतली. तेव्हा श्रीपेरुम्बुदुरच्या मेवालुर्कुप्पमच्या जवळ आरोपी असल्याचं माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी आरोपींना घेरलं. तेव्हा मुर्थसाने गोळी मारत पळण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी प्रत्युत्तराच्या कारवाईत मारला गेला. त्याचा साथीदार नईम अख्तरला अटक केली असून बंदूक आणि इतर हत्यारं जप्त केली आहेत.

“पोलीस पथकाला आवश्यक असल्यास प्रत्युत्तर देण्याची परवानगी होती. कारण आरोपींकडे शस्त्र असल्याचं पोलिसांना माहिती होतं”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.