Chennai News: पार्सल आणायला उशीर झाला म्हणून फूड डिलीव्हरी करणाऱ्या बॉयला अनेकवेळा बेदम मारहाण झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर डिलीव्हरी बॉयला मारहाणीच्या घटनांचे व्हिडीओ देखील अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. आता अशीच एक धक्कादायक घटाना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये घडली आहे. एका फूड डिलीव्हरी बॉयने पार्सल देण्यास उशीर केल्यामुळे एका महिला ग्राहकाने शिवीगाळ करत तक्रार दिल्याने फूड डिलीव्हरी बॉयने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकी घटना काय घडली?

तामिळनाडूच्या कोलाथूरमधील एका १९ वर्षीय फूड डिलीव्हरी बॉयने मंगळवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मात्र, आत्महत्या करण्याच्या आधी फूड डिलीव्हरी बॉयने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोट समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. सुसाईड नोटमध्ये म्हटलं की, आपण किराणा सामान देण्यासाठी एका ग्राहकाकडे गेलो होतो. मात्र, त्या महिला ग्राहकाने आपल्याला शिवीगाळ केली. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच महिला ग्राहकाने शिवीगाळ केल्यामुळे निराशा आली होती. त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Karnataka High Court Pakistan
Karnataka High Court: बंगळुरूमधील परिसराला न्यायाधीशांनी म्हटलं ‘पाकिस्तान’, सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केली नाराजी
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Tirupati Balaji Prasad
Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर!
court hammer pixabay
अटकेतील आरोपीचा न्यायालयालाच गंडवण्याचा प्रयत्न; न्यायमूर्ती संतापून म्हणाल्या, “याच्यावर तातडीने…”
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हेही वाचा : अटकेतील आरोपीचा न्यायालयालाच गंडवण्याचा प्रयत्न; न्यायमूर्ती संतापून म्हणाल्या, “याच्यावर तातडीने…”

डिलीव्हरी बॉयचं काम करणारा १९ वर्षीय मुलगा हा बी कॉमचं शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना हा मुलगा अर्धवेळ डिलीव्हरी बॉयचं काम करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी पवित्रनला कोरत्तूर येथील एका ग्राहकाला किराणा सामान पोहोचवण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्याला ग्राहकाचं घर शोधण्यात वेळ गेला. त्यामुळे पार्सल पोहोचवण्यास उशीर झाला. मात्र, पार्सल पोहोचवण्यास उशीर झाल्यामुळे महिला संतप्त झाली. यावरून महिला आणि पवित्रनमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने त्याच्या विरोधात संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे कंपनीने त्याच्यावर कारवाई केली. पण त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही.

यानंतर पवित्रनने ग्राहकाच्या घरी जाऊन त्याच्या खिडकीवर दगडफेक करत काच फोडली. यामुळे पुन्हा हा वाद वाढला. यानंतर त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पवित्ररान चौकशीसाठी बोलावलं आणि समज देऊन सोडून दिलं. तो विद्यार्थी असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावेळी त्या मुलाचे आई-वडीलही उपस्थित होते. मात्र, या संपूर्ण घटनेमुळे मुलाच्या मनात निराशा आली. या वादानंतर पाच दिवसांनी डिलीव्हरी बॉयने आत्महत्या करत जीवन संपवलं, अशी माहिती पोलिसांनी सांगितली. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे. दरम्यान, सुसाईड नोटमध्ये डिलीव्हरी बॉयने आत्महत्येच्या मागील कारणे सांगितल्याच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.