scorecardresearch

Premium

रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव कारनं उडवलं अन्…; थरकाप उडवणारी घटना समोर

अपघातानंतर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

car accident chennai
चेन्नईत पादचाऱ्याला कारने उडवलं. ( फोटो सौजन्य – स्क्रीनगॅब, इंडिया टुडे )

चेन्नईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून चाललेल्या एका पादचाऱ्याला समोरून आलेल्या कारनं धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

बुधवारी ( २७ सप्टेंबर ) दुपारी किलपॉक परिसरात ही घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पलानी असं मृत्यू झालेल्या, तर जयकुमार असं कार चालकाचं नाव आहे.

dadar flower market
फुलांचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
gambling raid, crime , police raid
नाशिक: जुगार अड्ड्यावर छापा; ३७ जणांविरुध्द कारवाई
MCOCA against gang robbing passengers old Mumbai-Pune road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
navi mumbai police hit by car, navi mumbai crime news, navi mumbai police accident,
दुचाकीवरून घसरून पडलेल्या युवकाला मदत करणाऱ्या पोलिसालाच कारने उडवले, चालकावर गुन्हा दाखल 

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पलानी रस्त्यावरून चालत जात होते. तेव्हाच, समोरून येत असलेल्या जयकुमार यांच्या कारनं पलानींना समोरून जोरदार धडक दिली. यात पलानी हवेत उडून खाली पडले आणि कार पुढील तीनगाड्यांना धडकली. धडक एवढी जोरदार होती की पलानी यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर पोलिसांनी कारचालक जयकुमारवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याप्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chennai man dies after speeding car rams him caught on cctv ssa

First published on: 28-09-2023 at 16:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×