सोशल मीडियावर अनेक महिलांशी मैत्री करून त्यांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमवारी चेन्नई पोलिसांनी एका २७ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जैद नावाचा आरोपी बीकॉम ग्रॅज्युएट असून तो किलपॉक येथे राहतो. तो व्यवसायाने मॉडेल आहे.


झैद त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अनेक महिलांशी चॅट करायचा आणि लग्नाच्या बहाण्याने त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा. त्याने या महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसेही घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. पीडितांपैकी एका महिलेने व्हेपेरी ऑल महिला पोलिस ठाण्यात झैदविरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीत, महिलेने म्हटले आहे की, तिचे २०२० पासून झैदसोबत संबंध होते. तो तिच्याशी लग्न करेल असे वचन देऊन झैदने अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे महिलेने म्हटले आहे. तिने जैदला लग्नासाठी विचारले असता त्याने तिच्याशी बोलणे बंद केले.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…


पोलिसांनी चौकशी करून सोमवारी जैदला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कारासाठी शिक्षा), ३८४ (खंडणीसाठी शिक्षा) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.