पेट्रोल-डिझेलवरील करांमध्ये कपात न करणाऱ्या बिगर-भाजपशासित राज्य सरकारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. या राज्यांमध्ये इंधन दर अधिक आहेत.  सहा महिने वाया गेले पण, आता तरी करकपात करून लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. मोदींनी करोना आढावा बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या इंधन दरवाढीच्या या मुद्द्यावरुन आता वादाचा भडका उडाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीमध्ये या बैठकीसंदर्भात वक्तव्य केलंय.

मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी करोना आढावा बैठकीमध्ये मोदींनी दिलेल्या इंधनावरील कर कमी करण्याच्या सल्ल्याचा समाचार घेतला. “३८ टक्के भारत सरकारच्या तिजोरीमध्ये भर घालतो. त्यात आम्हाला किती परत मिळतोय चार ते पाच टक्के.
त्यांच्याकडे जवळजवळ २७-२८ हजार कोटी आहेत,” असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना भुजबळांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले तेव्हा सरकारने दर कमी केले नाही याची आठवण करुन दिली. “जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाले. तेव्हा भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाही ते वाढत राहिले. जेव्हा जास्त होते तेव्हा काँग्रेसने भाव कमी ठेवलेले. तेव्हाही ते आरडाओरड करत होते. मागच्या काही काळात भाव कमी झाल्यावर सुद्धा भाजपा सरकारनं भाव वाढवले. २७ लाख कोटी रुपये कमवले,” असं भुजबळ म्हणाले.

baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
Fact check on pm Narendra Modi waving hand to fish viral video
सुदर्शन सेतू उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ‘माशांना’ दाखवला हात? जाणून घ्या, व्हायरल Video मागील सत्य
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित

तसेच पुढे बोलताना केंद्राने कर कमी केला तर राज्याचा आपोआप कमी होईल असंही भुजबळांनी म्हटलं. “तुम्ही काही कमी केले तर आपोआप कमी होईल. १०० रुपयाला २० कर असेल तर आम्ही १२० वर कर आकारतो. त्यांनी २० कमी केले तर १०० वर कर बसेल तर आपोआप टॅक्स कमी होतोच,” असं भुजबळ म्हणाले.

“करोनाची मिटींग चाललीय तर करोनावर बोलावं,” असंही भुजबळ यांनी हात चोळताना स्मीतहास्य करत म्हटलं. “मुख्यमंत्र्यांना सांगितलं असतं की मी डिझेल पेट्रोलवर बोलाणार आहे. ते डिझेल पेट्रोलच्या तयारीत गेले असते,” असंही भुजबळ म्हणाले. “बरं, त्या मिटींगमध्ये फक्त ते बोलणार दुसरं कोणी बोलायचं नाही. ते बोलणार आणि ते मिडियात येणार तेवढच,” असा टोलाही भुजबळांनी लगावला.