छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लोकपर्व हरेलीच्या निमित्ताने राज्यात गोमूत्र खरेदी योजना सुरू केली आहे. गोधन न्याय मिशन योजनेअंतर्गत बघेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच ही योजना सुरू केली. बघेल यांनी स्वत:च्या गोठ्यातून ५ लिटर गोमूत्र आणले होते. प्रती ४ रुपये दराने बघेल यांनी हे गोमूत्र चांदखुरी बचत गटाला विकले आहे. आपल्या गोठ्यातील गोमूत्र विकून भूपेश बघेल हे आपल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी गोमूत्र खरेदी योजनेचे पहिले विक्रेते ठरले आहेत.ेतहु

हेही वाचा- कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्यानंतर आणखी एका तरुणाची हत्या, १४४ कलम लागू

गोमूत्र खरेदी करणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. बघेल यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला आहे. आज हरेली सणाच्या शुभ मुहूर्तावर आम्ही राज्यात गोमूत्र खरेदी योजना सुरु केली आहे. यावेळी चांदखुरीच्या निधी बचत गटाला ५ लिटर गोमूत्र विकून मी पहिला विक्रेता ठरलो आणि मला २० रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे ट्वीट करत बघेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सेंद्रिय शेतीच्या प्रयत्नांना गती देण्याचा तसेच गोमूत्र विक्रीतून गोरक्षकांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचा शासनाचा हेतू आहे. सरकारला महसूल मिळण्याबरोबरच सेंद्रिय कीटकनाशकांसह सेंद्रिय खतांचीही राज्यात निर्मिती होणार आहे. शेण आणि गोमूत्र खरेदी करून सरकार राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हेही वाचा- निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा

२ रुपये किलो शेण आणि ४ रुपये लिटर गोमूत्र

दोन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या गोधन न्याय योजनेदम्यान ही संकल्पना राबवण्यात येत आहे. छत्तीसगड सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेपैकी ही योजना मानली जात आहे. या योजनेअंतर्गत गायीचे शेण २ रुपये प्रति किलो तर गोमूत्र ४ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केली जाणार आहे.