‘मॅडम, सुट्टी हवी असेल तर मला एकांतात भेटा’, ही लैंगिक संबंधाची मागणी करणारी टिप्पणी नाही – हायकोर्ट

फिर्यादी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा शारिरीक संपर्क नाही झाला किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा आवाहन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अशी टिप्पणी करणं हा अपराध मानला जाऊ शकत नाही.

छत्तीसगढ उच्च न्यायालयाने एका सहाय्यक प्राध्यापकाविरोधातली एफआयआर रद्द करत असताना एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. मॅडम, सुट्टी हवी असेल तर मला एकांतात भेटा अशी टिप्पणी लैंगिक संबंधांची मागणी करणारी नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाने या प्रकरणातला निर्णय देताना म्हटलं आहे की, फिर्यादीने कलम ३५४ अ अंतर्गत आरोप लावले आहेत. मात्र, फिर्यादी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा शारिरीक संपर्क नाही झाला किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा आवाहन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अशी टिप्पणी करणं हा अपराध मानला जाऊ शकत नाही.

या प्रकरणात न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास म्हणाले, “जर आपण हे प्रकरण पाहिलं तर फिर्यादीचं म्हणणं आहे की आरोपी त्यांना म्हणाला, मॅडम, तुम्हाला सुट्टी हवी असेल तर मला एकांतात भेटा. मात्र यावरुन हे अनुमान लावता येणार नाही की ही टिप्पणी लैंगिक संबंधाची मागणी करणारी आहे. त्यामुळे आरोपीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करता येणार नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhattisgarh hc sexually coloured remark vsk

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य