छत्तीसगढ उच्च न्यायालयाने एका सहाय्यक प्राध्यापकाविरोधातली एफआयआर रद्द करत असताना एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. मॅडम, सुट्टी हवी असेल तर मला एकांतात भेटा अशी टिप्पणी लैंगिक संबंधांची मागणी करणारी नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयाने या प्रकरणातला निर्णय देताना म्हटलं आहे की, फिर्यादीने कलम ३५४ अ अंतर्गत आरोप लावले आहेत. मात्र, फिर्यादी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा शारिरीक संपर्क नाही झाला किंवा लैंगिक संबंधाची मागणी किंवा आवाहन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अशी टिप्पणी करणं हा अपराध मानला जाऊ शकत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh hc sexually coloured remark vsk
First published on: 06-11-2021 at 17:32 IST