पतीने जबरदस्ती सेक्स केला तरी तो बलात्कार नाही – हायकोर्ट

विवाहित पत्नीसोबत पतीने जबरदस्तीने किंवा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे.

High-Court-Verdict
प्रातिनिधीक फोटो

छत्तीसगड हायकोर्टानं पतीने पत्नीवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने जबरदस्तीने किंवा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नीचं वय १८ वर्षाखाली असू नये, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. या प्रकरणात कोर्टाने पतीना आरोपमुक्त केलं आहे. छत्तीसगड हायकोर्टातील जस्टीस एनके चंद्रवंशी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दुसरीकडे पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत.

छत्तीसगडमधील एका महिलेने ३७ वर्षीय पतीवर जबरदस्ती आणि इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंडाप्रकरणी छळ केल्याचा आरोपही केला होता. दोघे २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. लग्नानंतर पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचबरोब हुंड्यासाठी छळ केला, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने ४९८, ३७६, ३७७ आणि ३४ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

“त्यांचं ऑफिस जमिनीखाली आहे”; ED ने सुप्रीम कोर्टात दिली चक्रावून टाकणारी माहिती

“पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार ठरत नाही. पण पत्नीचं वय हे १८ पेक्षा कमी नसावं. त्यामुळे हा बलात्कार नाही. तक्रारकर्ती महिला आरोपीची पतनी आहे. त्यामुळे हा बलात्कार नाही.”, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. दुसरीकडे पत्नीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी कोर्टाने कलम ३७७ अंतर्गत गुन्हा निश्चित केला आहे. कोणत्याही प्रकारचा अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करणं हा गुन्हा आहे, असं मत कोर्टाने नोंदवलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhattisgarh high court discharged a man from facing trial for allegedly raping his wife rmt

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या