scorecardresearch

Premium

भावाला भेटू द्या! भाऊबीजेला छोटा राजनच्या बहिणींची विनंती

सध्या छोटा राजनला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे

Chhota Rajan Sister,छोटा राजनच्या बहिणीं

गुंड छोटा राजनच्या बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला भेटता यावे, यासाठी परवानगी मागितली आहे. राजनच्या बहिणींनी त्यासाठी सीबीआय न्यायालयात शुक्रवारी विनंती अर्ज दाखल केला. सध्या छोटा राजनला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालय छोटा राजनला त्याच्या बहिणींना भेटून देण्याची शक्यता फारच कमी आहे.
काही दिवसांपूर्वीच छोटा राजन याला अटक करून भारतात आणण्यात आले होते. दिल्ली व मुंबई येथे त्याच्यावर खंडणी, अमली पदार्थ तस्करी, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजनची चौकशी सीबीआय म्हणजे केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-11-2015 at 12:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×