इस्लामाबाद : खैबर पख्तुनवा प्रांतातील शतकभरापूर्वीच्या हिंदूू मंदिरात यंदा दिवाळी साजरी करण्यात येणार असून या मंदिरावर गेल्यावर्षी कट्टर इस्लामवाद्यांनी हल्ला करून ते पेटवून दिले होते.   पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलझार अहमद यांना पाकिस्तानी हिंदूू कौन्सिलने या  दिवाळी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.  सिंध व बलुचिस्तानातून हिंदूू भाविक सोमवारपासून या कार्यक्रमासाठी कराक येथे येणार आहेत. कौन्सिलचे प्रमुख व नॅशनल असेंब्लीचे प्रमुख डॉ. रमेश कुमार वंकवानी यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकारी  कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्यातून एक ठोस संदेश समाजकंटकांना मिळेल.सरन्यायाधीशांनी हे मंदिर पुन्हा उभारण्याचा आदेश दिला होता. समाजकंटकांकडून ३३ दशलक्ष डॉलर वसूल करण्यास सांगितले होते.