China Accident News: चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनमधील झुहाई शहरात एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झुहाई शहरातील एका स्पोर्ट्स सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोक जमलेले होते. मात्र, याचवेळी एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कारने तब्बल ३५ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ३५ जणांचा मृत्यू आणि जवळपास ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेतील कारचालकाला पोलिसांनी घटनेनंतर लगेच अटक केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी लोकांचा मोठा आक्रोश सुरु होता, असं सांगितलं जात आहे. या घटनेसंदर्भात काही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : Canada : कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराचा कार्यक्रम रद्द; खलिस्तानी धमकीमुळे हिंसाचाराची भीती

या घटनेबाबत काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोक रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. तसेच जखमी झालेले लोक आक्रोश करत असल्याचंही दिसून येत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने ताताडीने धाव घेत मदतकार्य करत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, हा अपघात होता की यामागे काही वेगळा हेतू होता? याबाबत पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

Story img Loader