नवीन वर्षातील पहिले अडीच महिन्यांचा कालावधी संपलाय. मागील दोन वर्षांमध्ये करोना महामारीमुळे जो त्रास झाला, जे आर्थिक नुकसान झालं ते सारं विसरुन जग पुन्हा नव्याने सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहे. ओमायक्रॉनसारख्या नव्या व्हेरिएंटमुळे करोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ आणि त्यानंतर करोना रुग्णसंख्येत सातत्याने होणारी घट यामुळे भारतासहीत अनेक देशांमध्ये सध्या तरी करोना रुग्णांसंदर्भात दिलासादायक चित्र दिसत आहे. ही साथ आता संपल्यात जमाय असं चित्र अनेक देशांमध्ये दिसत आहे. मात्र असं असतानाच आता चीनने पुन्हा एकदा जगभरातील देशांना धडकी भरवणारी बातमी दिलीय. खरोखरच करोनाची साथ संपलीय का असा विचार करणारा लावणारी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालीय.

२०१९ च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये चीनमध्ये सर्वात प्रथम आढळून आलेल्या करोनाच्या विषाणूनंतर तेथे अनेक करोनाच्या लाटा येऊन गेल्या. मात्र आता या देशामध्ये ओमायक्रॉन या करोना विषाणूची मोठी लाट असून रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागलीय.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार

२०२० च्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चीनने तातडीने करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये उभारली होती तशीच धावपळ पुन्हा एकदा आता चीनमध्ये दिसत आहे. तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये बांधण्यास चीनने सुरुवात केलीय. यावरुनच आता पुन्हा एकदा चीनमध्ये आलेली करोनाची लाट किती मोठीय याचा अंदाज बांधता येईल. सरकारी मालकीय सीसीटीव्ही या वृत्तवाहिनीवर बुधवारी दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये अनेक मोठ्या क्रेन्स तात्पुरत्या स्वरुपाचं रुग्णालय उभारण्यासाठी ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतामध्ये काम करत असल्याचं दिसून आलंय. चीनमधील या प्रांतात एका आठवड्यात पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आलेत.

२ कोटी ४० लाख लोकसंख्या असणाऱ्या या प्रांतामध्ये केवळ २२ हजार ८८० बेड्स उपलब्ध असल्याने तातडीने या तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालयाची उभारणी केली जाते आहे. मंगळवारीच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये उभारलेल्या सहा हजार रुम्सची सेवा जिलिन शहरामध्ये तसेच चँगचुआन उपनगरांमध्ये कार्यरत करण्यात आलीय. ही सेवा पूर्वी वुहानमधील करोना संसर्गाच्या वेळेस वापरण्यात आलेली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते असा प्रशासनाचा अंदाज असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात सेवा उभारल्या जात आहेत.

बुधवारी चीनमध्ये करोनाचे ३ हजार २९० रुग्ण आढळून आले. यापूर्वी मंगळवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक करोना रुग्ण चीनमध्ये आढळून आले होते. हा नवीन विषाणू अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. चीनमध्ये झिरो कोव्हिड धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्याने इतर देशांच्या तुलनेत कमी रुग्ण संख्या वाटत असली तरी हजारच्या वर रुग्ण आढळल्यास येथील यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अनेक शहरांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन जारी करण्यात आलाय.