भारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असताना दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिल आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संकट

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. बाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असून अनेक पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. तसंच मनोरंजनाच्या अनेक ठिकाणी टाळं लावण्यात आलं आहे. काही भागांमध्ये तर लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे.

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

दुसरीकडे चीनच्या Lanzhou भागात लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर घराबाहेर पडणाऱ्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

विमानांचं उड्डाण रद्द, लॉकडाउनचाही निर्णय

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे. सध्या चीनमध्ये गेल्या २४ तासाच १३ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही अॅक्टिव्ह रुग्ण आढळू नये यासाठी चीनकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळेच एकही रुग्ण सापडला तरी चिनी प्रशासन गांभीर्याने घेत आहे.