भारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असताना दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संकट

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. बाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असून अनेक पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. तसंच मनोरंजनाच्या अनेक ठिकाणी टाळं लावण्यात आलं आहे. काही भागांमध्ये तर लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China covid outbreak cause flights cancelled schools closed lockdown sgy
First published on: 22-10-2021 at 10:39 IST