बीजिंग : चीनने अतिशय प्रगत अशी युद्धनौका पाकिस्तानला दिली असून त्यामुळे  हिंदूी महासागर व अरबी समुद्रात पाकिस्तानचे म्हणजेच पर्यायाने चीनचे वर्चस्व वाढणार आहे.

अलिकडे हिंदूी महासागराच्या प्रदेशात वर्चस्व निर्माण करण्याचे चीनचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. ही युद्धनौका चायना स्टेट शिपबििल्डग कार्पोरेशन लि. या कंपनीने तयार केली असून शांघाय येथील कार्यक्रमात ती पाकिस्तानच्या नौदलास देऊन कार्यान्वित करण्यात आली असे सीएसएससीने म्हटले आहे. या युद्धनौकेचा प्रकार ०५४ ए- पी फ्रिगेट हा असून तिचे नाव पीएनएस तुघ्रील असे असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मोईन उल हक यांनी सांगितलेकी, पीएनएस तुघ्रील युद्धनौका कार्यान्वित करण्यात आल्याने हिंदूी महासागरातील शक्ती समतोल साधला गेला आहे.

ग्लोबल टाइम्सच्या बातम्यात म्हटले आहेकी, सुरक्षा परिस्थितीचा विचार करता पाकिस्तानच्या नौदलाची क्षमता या युद्धनौकेमुळे साधला गेला आहे. सागरी संरक्षण, शांतता, स्थिरता व समतोल यांचा हिंदूी महासागराच्या प्रदेशात समतोल साधण्यास यामुळे मदत होणार आहे. अशा चार युद्धनौका पाकिस्तानी नौदलासाठी तयार करण्यात येत असून त्यातील ही पहिलीच युद्धनौका आहे. या युद्धनौकेत जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, पाण्यातून वरच्या भागात मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय टेहळणीतही ही युद्धनौका उपयोगाची आहे, असे पाकिस्तानच्या नौदलाने म्हटले आहे. या युद्धनौकेवर अतिप्रगत युद्धसामुग्री असून इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राची व्यवस्था आहे. एकाचवेळी जास्त नौदल युद्धतंत्र मोहिमा राबवण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. चीनने निर्यात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व प्रगत युद्धनौका आहे. चीनचे पाकिस्तानशी सुरक्षा संबंध मजबूत असून  वेळोवेळी चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे व इतर सामुग्री पुरवली आहे. नौदल जहाजांशिवाय चीनने पाकिस्तानच्या हवाई दलास जेएफ १७ थंडर फाइट विमानेही दिली आहेत. निरीक्षकांच्या मते चीनने अलिकडच्या काळात हिंदूी महासागरात वर्चस्व वाढवले असून त्यामुळे भारतालाही फटका बसत आहे.हिंदूी महासागरात दिजबौती येथे पहिला लष्करी तळ  चीनने उभारला असून चीनने पाकिस्तानचे ग्वादर बंदर ताब्यात घेतले आहे ते अरबी समुद्रात असून चीनमधील शिनजियांग प्रांताला ते जोडते. चीन- पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्पात म्हणजे सीपीइसीत त्याचा समावेश  करण्यात आला आहे. चीनने श्रीलंकेतील हंबनतोटा बंदर ९९ वर्षांच्या कराराने घेतले आहे. त्यामुळेही चीनचे वर्चस्व वाढले आहे.

पेंटॅगॉनच्या अहवालात भारतातील खेडय़ाचा चीनच्या हद्दीत समावेश.. नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेले व चीनने बांधलेले खेडे पेंटॅगॉनच्या अहवालात चीनच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून दाखवण्यात आले आहे. सुरक्षा आस्थापनांच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील लष्करी व सुरक्षा घडामोडी या विषयावरील अहवालात म्हटले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशातील विवादित प्रदेशात एक खेडे बांधले असून ते चीनच्या अधिपत्याखाली आहे. सूत्रांनी म्हटले आहे की,  हे खेडे अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात असून तो प्रदेश चीनच्या नियंत्रणात आहे. या भागात चीनच्या लष्करी चौक्या आधीपासून होत्या. पण अलिकडच्या काळात चीनने जी बांधकामे केली त्यात त्याचा समावेश नाही. सहा दशकांपूर्वी चीनने जो प्रदेश व्याप्त प्रदेश म्हणून ताब्यात घेतला, त्या भागात हे खेडे समाविष्ट असून त्याचा आताच्या घडामोडींशी संबंध नाही. हे खेडे चीनने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या व्याप्त प्रदेशात बांधले आहे. १९५९ मध्ये आसाम रायफल्सवर चीनने लोंगजू मोहिमेत विजय मिळवून अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील काही भाग ताब्यात घेतला होता, तो चीनव्याप्त प्रदेश आहे.