पाकिस्तानचे आणि चीन हे दोन्ही देश भारतावर कुरघोडी करण्याकरता सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. एकमेकांना मदत करत परस्पर सहकार्यही वाढवत आले आहे. याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्ष चीन पाकिस्तानला लष्करी मदत करत आला आहे. यााआधी JF-17 हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला चीनने पाकिस्तानला मदत केली होती. आता तर JF-17 हे पाकिस्तान वायू दलाचा महत्त्वाचे लढाऊ विमान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं असतांना चीन युद्धनौकांच्या बाबतीतही पाकिस्तानला मदत करत आहे. चीन अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट Type 054 ही पाकिस्तानला देणार आहे. एक युद्धनौका तर पुढील काही दिवसांत पाकिस्तानला मिळणार आहे. तर आणखी ३ युद्धनौका चीन पुढील ३ वर्षात पाकिस्तानकडे सुपुर्त करणार आहे.

Type 054 ही सुमारे ४ हजार टन वजनाची फ्रिगेट- युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही अशी या युद्धनौकेची रचना आहे. जमिनीवर, हवेत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका दर्जेदार समजली जाते.

अशा २५ पेक्षा जास्त युद्धनौका या चीनच्या नौदलात याआधीच कार्यरत आहेत. आता पुढील काही वर्षात चीनी बनावटीच्या अशा चार युद्धनौका या पाकिस्तानकडे असतील. यामुळे निश्चितच भारताची डोकेदुखी वाढणार आहे. युद्धप्रसंग उद्भवल्यास Type 054 युद्धनौका या भारतीय नौदलापुढे मोठं आव्हान निर्माण करु शकतात अशी या युद्धनौकेची क्षमता आणि ताकद आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China going handover 4 new stealth frigates warships to pakistan asj
First published on: 09-11-2021 at 12:29 IST