scorecardresearch

चीनच्या अपघातग्रस्त विमानांचे अवशेष सापडण्यास सुरुवात

या विमानातील ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ असलेला दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स बुदवारी सापडला होता.

image credit AP

वुझोऊ : या आठवडय़ाच्या सुरुवातीला १३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्स शोधण्याच्या प्रयत्नांत पावसामुळे अडथळे येत असले, तरी दक्षिण चीनमधील पर्वतीय भागात हे शोधकार्य गुरुवारीही सुरू होते. अपघातानंतर तीन दिवसांनी प्रथमच ढिगाऱ्याचे मोठे तुकडे सापडल्याचे वृत्त असून, त्यात इंजिनाचे भाग आणि या विमान कंपनीचे लाल व निळे बोधचिन्ह असलेला पांढऱ्या रंगाचा पंखाचा मोठा भाग यांचा समावेश आहे.

या विमानातील ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ असलेला दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स बुदवारी सापडला होता. त्याचे बाहेरील आवरणाचे नुकसान झाले असले, तरी आतील नारंगी रंगाचे सिलेंडर तुलनेने शाबूत असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले.

अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी शोधमोहिमेवर परिणाम झाला असून, साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी पंप वापरले जात आहेत. तीनशेहून अधिक स्वयंसेवक शोधमोहिमेत सहभागी झाले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘पंपांच्या वापरामुळेच काल ब्लॅक बॉक्सच्या शोधासाठी मोठी मदत झाली’, असे तो पत्रकारांशी बोलताना म्हणाला. अपघातग्रस्त बोइंग ७३७-८०० विमान सोमवारी २९ हजार फूट उंचीवर उडत असताना ते अचानक दुर्गम अशा पर्वतीय भागात सरळ खाली कोसळले. यामुळे आजूबाजूच्या जंगलांमध्ये आग लागली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China plane crash search teams found human remains and engine debris zws

ताज्या बातम्या