China population Shrink for third straight year : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आणि चीन या दोन आशिया खंडातील देशांचा समावेश होतो. मात्र नुकतेच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चीनची लोकसंख्या सलग तिसर्‍या वर्षी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चीन सरकारने शुक्रवारी याबद्दल माहिती देताना सांगितले की, यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकाचा देश असणार्‍या चीनसमोर भविष्यातील लोकसंख्येसंबंधी आव्हाने उभी ठाकली आहेत. चीन सध्या वृद्ध लोकांची वाढती संख्या याबरोबरच काम करणाऱ्या लोकांचा तुटवडा या संकटांचा सामना करत आहे

२०२४ च्या अखेरीस चीनची लोकसंख्या १.४०८ अब्ज इतकी नोंदवली गेली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत १.३९ दशलक्षाने कमी झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षात चीनमध्ये जवळपास ९.५४ दशलक्ष मुलांचा जन्म झाला, गेल्या वर्षी पेक्षा हा आकडा ५२०,००० ने जास्त आहे.

Donald trump America china relations
अमेरिका चीन भाई भाई?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : चीनसह भारतालाही तडाखा?
DeepSeek surge hits companies, posing security risks
‘डीपसीक’मुळे अमेरिकेच्या विदा सुरक्षेला धोका?
Rupee fells all Time low Against Dollar
रूपयाची गटांगळी; डॉलरमागे ८७.४६ चा नवीन नीचांक
Trump tariffs impact against china canada and mexico
चीन, कॅनडा, मेक्सिकोविरुद्ध ट्रम्प यांचे ‘टॅरिफ युद्ध’ सुरू! पुढचा नंबर ‘ब्रिक्स’ आणि भारताचा?
President donald Trump Imposes tariffs hike on china canada and mexico
व्यापारयुद्धाचे रणशिंग; चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर; शेजारी देशांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर
China is making huge fusion research facility
अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी चीनने तयार केले संशोधन केंद्र? याचा अर्थ काय? या घडामोडीमुळे भारतावर काय परिणाम?

इयर ऑफ ड्रॅगन हे चीनी राशी चक्रातील वर्ष मुलांना जन्म देण्यासाठी शुभ मानले जाते त्यामुळे हा आकडा वाढला असू शकतो असे सांगितेल जात आहे. तरीही १९४९ साली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेपासून ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वात कमी जन्मसंख्या आकडेवारी आहे.

चायनीज सरकारने जाहीर केलेली या अकडेवारीचा ट्रेड जगभरात पाहायाला मिळत आहे विशेषतः पूर्व आशिया, जेथे जपान दक्षिण कोरिया, हाँग काँग आणि इतर देशांमध्ये जन्मदर खूप कमी झाला आहे. जपान आणि पूर्व युरोपातील इतर राष्ट्रांमध्ये लोकसंख्या वेगाने कमी होत आहे, यामध्ये आता चीनचाही समावेश झाला आहे.

नेमकं कारण काय?

लोकसंख्या कमी होण्याची कारणे सर्व प्रकरणांमध्ये एकसारखीच आहे. यामध्ये उदर निर्वाह करण्याचा खर्च वाढल्याने अनेक तरूण लोक लग्न आणि मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. तरुणांकडून लग्न आणि मुले यापेक्षा उच्च शिक्षण घेणे आणि करियरच्या वाढीकडे लक्ष देण्यावर भर दिला जात आहे. लोक दीर्घकाळ जगत असले तरी जन्मदर वाढण्यासाठी हे पुरेसे नसल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader