चीनमध्ये सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या चाचण्या सुरू

चीनमध्ये जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली

चीनमध्ये जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली असून, त्याचा परावर्तक ३० फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, त्याचे ४४५० पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. आता त्याच्या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शेवटच्या चाळीस मिनिटांत त्रिकोणी आकाराची पॅनेल्स डिशवर बसवण्यात आले. काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये या दुर्बिणीचे काम सुरू होईल असे शिनहुआ न्यूज एजन्सीने म्हटले आहे. बिल्डर्स, तज्ज्ञ, वार्ताहर वायव्येकडील ग्विझाऊ  येथे उपस्थित होते. पिंगटांग येथे ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. आता या दुर्बिणीची तपासणी केली जात असून, पाचशे मीटर अ‍ॅपरचरची ही घनगोलाकार ही दुर्बीण आहे, असे नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन या संस्थेचे उपप्रमुख झेंग झियोनियन यांनी सांगितले. खोल अवकाशात संशोधन करण्यासाठी चीनने हा दुर्बीण प्रकल्प आखला आहे. आता चीनने स्वस्तात काहीतरी उत्पादने करण्यापासून दूर जाऊन विज्ञान व तंत्रज्ञानात दर्जेदार संशोधन करण्याचे ठरवले आहे. विश्वाचे सखोल संशोधन व परग्रहावरील जीवसृष्टीचे संशोधनही त्यात केले जाणार आहे. येत्या १० ते २० वर्षांत एवढी मोठी रेडिओ दुर्बीण तयार होण्याची शक्यता आहे. प्युटरे रिकोतील आर्सेसिबो ऑब्झर्वेटरीपेक्षा ही दुर्बीण मोठी असून, तिचा व्यास खूप मोठा आहे. जर्मनीतील १०० मीटर दुर्बिणीपेक्षा ती दहापट संवेदनशील आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: China puts finishing touches to worlds biggest radio telescope

ताज्या बातम्या