चीनमधील करोनाचे थैमान थांबायला तयार नाही. चीनमधून भीतीदायक आकडे समोर येत आहेत. नवीन माहितीनुसार चीनमध्ये मागच्या ३५ दिवसांत जवळपास ६० हजार लोकांचा मृत्यू ओढवला आहे. चीनमध्ये करोना नियमांमध्ये शिथीलता दिल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यूची आकडेवारी समोर येत आहे.

चीनमध्ये ८ डिसेंबर २०२२ पासून ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत एकूण ५९,९३८ मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोग यांच्या ब्युरो ऑफ मेडिकल अॅडमिनिस्ट्रिशेनचे प्रमुख जिओ याहुई यांनी पत्रकार परिषद घेऊन चीनमधील करोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती दिली आहे. ही आकडेवारी फक्त हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची आहे, प्रत्यक्षात करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी यापेक्षा अधिक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

जिओ याहुई यांनी सांगितले की, करोना व्हायरसमुळे रेस्पिरेटरी फेल्युअर झाल्यामुळे ५ हजार ५०३ मृत्यू झाले आहेत. यासोबतच ५४ हजार ४३५ त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांना करोना सोबतच इतर आजार देखील होती. डिसेंबरच्या सुरुवातीला चीनने आपले झिरो कोविड धोरण शिथील केले होते. त्यानंतर करोनाने चीनमध्ये थैमान घालायला सुरुवात केली, असा आरोप सध्या चीनवर केला जात आहे.

इतर आजार आणि न झालेलं लसीकरण मृत्यूस कारणीभूत?

शनिवारी चीनमधील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की, मृत झालेल्या नागरिकांची वयोमर्यादा ही सरासरी ८०.३ इतकी आहे. ज्यामध्ये ६५ वर्षाहून अधिक वय असलेले ९० टक्के लोक आहेत. मृतांमध्ये बहुतांश लोकांना इतर गंभीर स्वरुपाचे आजार होते. चीनमध्ये ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या लाखो लोकांचे लसीकरण झालेले नाही, अशी माहिती मिळत आहे.