scorecardresearch

“चीनने वर्धक मात्रा म्हणून ‘कोवोवॅक्स’ला मान्यता द्यावी”, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचं मत

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून ही जगभरातील देशांसाठी चिंतेची बाब आहे, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.

“चीनने वर्धक मात्रा म्हणून ‘कोवोवॅक्स’ला मान्यता द्यावी”, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचं मत
संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून ही जगभरातील देशांसाठी चिंतेची बाब आहे, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या संकटावर मात करण्यासाठी आम्ही चीनला लसींचा पुरवठा करण्याबाबत विचार करत असल्याचेही ते म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – काय सांगता? चीन आता नंबर वन नाही? भारतानं लोकसंख्येत चीनला कधीच मागे टाकल्याचा नव्या सर्वेक्षणाचा अंदाज!

नेमकं काय म्हणाले अदर पुनावाला?

चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. चीनने लवकरात लवकर या संकटावर मात करावी, अशी आमची इच्छा आहे. चीनमधील करोना संकट हा जगातील प्रत्येक देशासाठी चिंतेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया अदर पुनावाला यांनी दिली आहे. भारतातील करोना परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, देशात करोनाची स्थिती सध्या चांगली आहे. आपल्याला घाबरण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याकडे एकून ९० टक्के लसीकरण झाले आहे. तसेच लोकांमध्ये हर्ड इम्‍युनिटीसुद्धा तयार झाली आहे.

हेही वाचा – ‘पैसे द्या, ब्लू टिक घ्या’, एलॉन मस्कच्या योजनेचा फायदा घेतायत तालिबानी; कट्टरपंथीयांचे ट्विटर व्हेरिफाईड

”चीनला लसींचा पुरवठा करण्यावर विचार”

यावेळी बोलाताना, सीरम इस्टिट्यूट चीनला लसींचा पुरवठा करण्याबाबत विचार करत असल्याची माहितीही अदर पुनावाला यांनी दिली. ”चीनने राजकीय मतभेत बाजुला ठेऊन पाश्चात्य देश आणि भारतातील लसींना वर्धक मात्रा म्हणून मान्यता द्यावी. यासंदर्भात आम्ही चीनशी संपर्क केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे ते म्हणाले. तसेच आम्ही चीनला कोवोवॅक्स लसी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कारण कोवोवॅक्स ओमिक्रॉन आणि इतर व्हेरिएंटवर प्रभावी आहे. कोवोवॅक्सला वर्धक मात्रा म्हणून युएसएफटीएसह ( USFTA ) युरोप आणि डीजीसीआयनेसुद्धा मान्यता दिली आहे. तुम्ही पहिल्या आणि दुसरी मात्रा कोणत्याही लसीची घेतली असेल तर वर्धक मात्रा म्हणून कोवोवॅक्सचा वापर करू शकता, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 14:48 IST

संबंधित बातम्या