चीनचे परराष्ट्र मंत्री यांग यी २४ मार्च रोजी संध्याकाळी भारत दौऱ्यासाठी आले होते. २५ मार्च रोजी त्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार वांग यी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचे होते पण त्यांचे निवासस्थान असलेल्या साउथ ब्लॉकने नम्रपणे नकार दिला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी २५ मार्चला उपस्थित राहणार असल्याने भारताने चीनला कळवले होते. अघोषित दौऱ्यावर असलेले वांग दोन वर्षांहून अधिक काळानंतर नवी दिल्लीत आले होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदींची भेट घेता आली नाही.

AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
PM Narendra Modi Arun Varnekar
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतःचे बोट छाटून देवीला केले अर्पण; कार्यकर्त्याचा अघोरी प्रकार
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा

वांग यी यांचा दौरा का जाहीर झाला नाही?

भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की अनेक कारणांमुळे चीनला या भेटीची पूर्व घोषणा नको होती आणि कोणताही द्विपक्षीय करार नसल्यामुळे आम्ही आमच्या बाजूने ही भेट जाहीर केली नाही. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की भारत आणि चीनमधील संबंध सामान्य नाहीत कारण कराराच्या विरोधात मोठ्या संख्येने सैन्य सीमेवर तैनात केले गेलेले आहे. स्थिर संबंधांसाठी सीमेवर शांतता आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘सैनिकांना संघर्षाच्या ठिकाणांवरून पूर्णपणे काढून टाका’

जोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहेत, तोपर्यंत सीमेवरील परिस्थिती सामान्य होणार नाही. दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्षाचे मुद्दे आहेत. पेगॉन्ग सरोवर क्षेत्राच्या समस्येसह काही समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने प्रगती झाली आहे. प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या १५ फेऱ्या झाल्या असून आज ही चर्चा कशी पुढे नेणार यावर चर्चा झाली, असे एस जयशंकर म्हणाले.

पूर्व लडाखमधील संघर्षांच्या उर्वरित टिकाणांवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे भारताने शुक्रवारी चीनला स्पष्ट शब्दांत सांगितले. सीमाभागातील परिस्थिती असामान्य असेल, तर द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर येऊ शकत नाहीत, यावर भारताने भर दिला.

संबंध पुन्हा सामान्य व्हायचे असतील, तर सीमा भागांत शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असेल, असे सुमारे तीन तास चाललेल्या ‘स्पष्ट’ चर्चेत एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना सांगितले.