अफगाणिस्तानमधील सरकारबद्दल चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य; पुतिन यांना म्हणाले…

अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात नुकतीच चर्चा पार पडली

Chinese President Xi Jinping, Russian President Vladimir Putin, Afghanistan Crisis, Kabul
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात नुकतीच चर्चा पार पडली (File Photo: Reuters)

अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात नुकतीच चर्चा पार पडली. यावेळी जिनपिंग यांनी चीन रशियासोबत संवाद मजबूत करण्यासाठी तसंच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायासाठी तयार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काबूलने सर्व दहशतवादी गटांपासून आपल्याला वेगळं करावं असंही यावेळी जिनपिंग यांनी पुतिन यांना सांगितलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

जिनपिंग आणि पुतिन यांच्यात बुधवारी फोनवरुन चर्चा झाली. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर जी-७ नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडल्याच्या दुसऱ्या दिवशी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात ही चर्चा झाली आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्याच्या मुद्यावरुन चर्चा करत आपलं मत मांडलं. दरम्यान नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अफगाणिस्तानवर पुतिन यांच्याशी चर्चा केली होती.

अफगाणिस्तानमध्ये समावेशक सरकार असावं

चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी यावेळी पुतिन यांना रशियाशी संवाद आणि समन्वय मजबूत करण्याचं आश्वासन दिलं. तसंच यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील सर्व गटांशी सल्लामसलत करून खुली आणि सर्वसमावेशक राजकीय रचना तयार करण्यासाठी, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी, सर्व दहशतवादी गटांपासून पूर्णपणे विलग होण्यासाठी आणि इतर जगासोबत आणि खासकरुन शेजारील देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन केलं.

पुतिन यांनी यावेळी अफगाणिस्तानातील स्थितीवर भाष्य करताना बाहेरील शक्ती जबरदस्ती आपलं राजकीय मॉडेल काही देशांमध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असून ते काम करत नाही आणि यामुळे या देशांना फक्त विनाश आणि आपत्तीचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर रशिया आणि चीनचू एकच भूमिका असल्याचं चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमाने म्हटलं आहे.

जिनपिंग आणि पुतिन यांच्यात पहिल्यांदाच ही चर्चा झाली आहे. चीनचे अफगाणिस्तानमधील राजदूतांची तालिबानसोबत नुकतीच चर्चा झाली असून यानंतर ही चर्चा पार पडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinese president xi jinping russian president vladimir putin spoke over afghanistan crisis sgy

ताज्या बातम्या