लडाखजवळच्या भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. दरम्यान लडाखमधील स्थानिक मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमधील वादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) मेंढ्या चरणाऱ्या लडाखमधील मेंढपाळांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चिनी सैनिक मेंढपाळांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते तर, मेंढपाळदेखील निर्भयपणे त्यांना तोंड देत होते. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर स्थानिक मेंढपाळ आणि पशुपालकांनी या परिसरात जनावरे चरण्यासाठी नेणं बंद केलं होतं. परंतु, आज (३१ जानेवारी) लडाखमधील काही मेंढपाळ भारताच्याच हद्दीत मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रत्यक्ष सीमारेषेजवळच्या कुरणांमध्ये मेंढ्या चरायला नेणाऱ्या मेंढपाळांना चिनी सैनिकांनी तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लडाखी मेंढपाळांनी चिनी सैनिकांना निक्षून सांगितलं की, ‘ही भारताची हद्द आहे’. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लडाखच्या पूर्व भागातला असल्याचं सागितलं जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व लडाखमधील स्थानिक पशुपालकांनी एलएसीजवळच्या (LAC) भागात गुरे चरायला नेणं बंद केलं होतं. पूर्व लडाखमधील पशूपालकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गुरे चरायला नेण्याची ही गेल्या दोन वर्षांमधली पहिलीच घटना आहे. दरम्यान, यावेळी भारतीय पशूपालकांनी या जमिनीवर आपला हक्क सागितला. त्याचबरोबर चिनी सैन्याला माघार घ्यायला लावली.

मेंढपाळांनी मोठ्या हिंमतीने चिनी सैनिकांचा सामना केला

पूर्व लडाखच्या चुशूलमधील नगरसेवक कोंचोक स्टॅनजिन यांनी मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमधील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. तसेच या मेंढपाळांचं कौतुक केलं आहे. मेंढपाळांनी दाखवलेल्या हिंमतीबद्दल त्यांची पाठ थोपटली आहे. तसेच मेंढपाळांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या भारतीय सैनिकांचेही आभार मानले.

हे ही वाचा >> पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

स्टॅनजिन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पशूपालकांनी पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात म्हणजेच पँगॉन्गच्या उत्तरेकडील किनारी भागात असलेल्या कुरणांवर हक्क सांगितला, त्यांची गुरे तिथे चरण्यासाठी नेली, त्याचवेळी भारतीय लष्करही त्यांच्या पाठिशी उभं होतं. हे सगळं पाहून आनंद झाला. इतके चांगले नागरी-लष्करी संबंध राखल्याबद्दल सीमावरती भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे आणि या नागरिकांची हित जपल्याबद्दल भारतीय लष्कराचे मी आभार मानतो.

Story img Loader