छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये उजव्या विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं धर्मांतराचा आरोप करत एका पाद्री आणि एका ख्रिश्चन संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. यासोबतच त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. रायपूरच्या पुराणी बस्ती पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. भाटागाव परिसरात जबरदस्तीने धार्मिक धर्मांतर केल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर काही स्थानिक उजव्या विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थोड्याच वेळात पोलीस स्टेशन गाठले.

उजव्या विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मगुरू हरीश साहूवर धर्मांतरामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला, त्यानंतर त्याला पुराणी बस्ती पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. यासह, छत्तीसगड ख्रिश्चन फोरमचे सरचिटणीस अंकुश बरियकर आणि प्रकाश मसीह या अन्य व्यक्तीवरही हल्ला करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साहूंवर धर्मांतरामध्ये सामील असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी फोन केल्यावर ते बारिकर आणि मसीहसह पोलीस ठाण्यात आले. पण तेथे असलेल्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिघांनाही स्टेशन प्रभारीसमोर मारहाण केली आणि त्यांच्यावर अत्याचार केले.

या घटनेनंतर, पुराण बस्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यदुमानी सिद्दार यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय यादव यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बारीकर यांनी घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम -१४७, २९४,३२३ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्ते संतापले होते आणि त्यांनी अशा धर्मांतरावर कारवाई करण्याची मागणी करत इमारतीला घेराव घातला होता. भटागाव परिसरातील ख्रिश्चन समुदायाच्या इतर काही सदस्यांसह पाद्री पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर पाद्रीला प्रभारी स्टेशनच्या खोलीत नेण्यात आले ज्यामुळे आणखी तणाव वाढला.