चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याकडील बंदुकीतून गोळी सुटून सिनेमॅटोग्राफर ठार

‘तपासकर्त्यांनी बाल्डविन यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले.

लॉस एंजल्स : ‘रस्ट’ या आपल्या चित्रपटाच्या सेटवरील चित्रीकरणादरम्यान अभिनेता अ‍ॅलेक बाल्डविन यांच्याकडून रंगभूमीवर वापरल्या जाणाऱ्या प्रॉपगनमधून (बंदूक) सुटलेल्या गोळीमुळे चित्रपटाची छायाचित्रण दिग्दर्शक ठार झाली, तर दिग्दर्शक जखमी झाला. ‘रस्ट’चे चित्रीकरण सध्या न्यू मेक्सिको येथील सांता फे परगण्यात होत आहे.

  या घटनेत सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स (४२) यांचा मृत्यू झाला, तर दिग्दर्शक जोएल सोझा (४८) हे जखमी झाले, अशी माहिती सांता फे काऊंटी शेरीफ कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिली.

‘तपासकर्त्यांनी बाल्डविन यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. त्यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. मात्र हा तपास सुरूच राहील. साक्षीदारांची जबानी घेण्याचे कामही सुरू राहील,’ असे शेरीफ कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

हचिन्स यांना हेलिकॉप्टरने न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले; तर सोझा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या रस्ट मूव्हीज प्रॉडक्शन्सने हलिनाच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदनात व्यक्त केली असून, चित्रपटाचे चित्रीकरण अनिश्चित काळासाठी थांबवले आहे.

दरम्यान, चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या बंदुकीतून अपघाताने गोळ्या सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असून त्याबद्दल पोलिसांच्या चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे, असे ट्विट बाल्डविन यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cinematographer was shot dead by the actor during the filming akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या