Confident Group chairman CJ Roy shoots himself dead : कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन रॉय चिरियनकंदथ जोसेफ यांनी शुक्रवारी बंगळुरू येथील लँगफोर्ड रोडवरील आपल्या कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते सी. जे. रॉय म्हणून देखील ओळखले जात. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित असताना ही घटना घडली आहे.

ही घटना दुपारी त्यांच्या कार्यालय असलेल्या बंगल्यात घडली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या सांगितले की रॉय यांनी कथितपणे त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली.

या घटनेनंतर रॉय यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना नारायण हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

भारत आणि बाहेर देखील विस्तार असलेली केरळमधील एक आघाडीची रिअर इस्टेट फर्म रॉय चालत होते. विशेष बाब म्हणजे बँकेकडून कर्ज न घेता प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते ओळखले जात. याला ते ‘झिरो-डेट बिझनेस’ असे म्हणत.

रॉय यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली होती. अडचणीत सापडलेल्या प्रकल्पांना ते आर्थिक आधार देत. याबरोबरच त्यांनी, अनेक टीव्ही शो स्पॉन्सर देखील केले होते.