CJP Abhijeet Dipke Meta Instagram Allegation: कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम पोस्ट हटवल्या जात असल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘मेटा’वर केला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी देखील त्यांच्या पोस्ट हटवल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केले नाही, केवळ सरकारला प्रश्न विचारला, टीका केलीय. सरकारला प्रश्न विचारणे इन्स्टाग्रमाच्या नियमांचे उल्लंघन आहे का? असा सवाल दिपकेंनी उपस्थित केला आहे.
सीजेपीच्या पोस्ट हटवल्याचा दिपकेंचा आरोप
दिपकेंनी केलेल्या पोस्टमध्ये मेटा सीजेपीच्या इन्स्टाग्राम पोस्ट का हटवत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केले नसताना आमच्या काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. या पोस्टमधून केवळ सरकारला प्रश्न विचारण्यात आलाय, जनसामान्यांचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. सरकारला प्रश्न विचारणे इन्स्टाग्रमाच्या नियमांचे उल्लंघन आहे का?, असा सवाल दिपकेंनी एक्सवरील पोस्टमधून उपस्थित केला आहे.
सौरव दास यांचाही आरोप
“इन्स्टाग्राम, मेटा माझ्या इन्स्टाग्राम खात्यावर बंधने का आणतंय आणि माझ्या पोस्ट देखील हटवल्या जाते आहेत? केवळ पोस्टमधून सत्ताधाऱ्यांवर टीका केली म्हणून? गेल्या अनेक दिवसांपासून कोलॅब फिचर देखील बंद आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मेटाला काहीच काळजी नाही का? सरकारच्या दबावाला बळी पडू नये असे आमचे मेटाला आवाहन आहे. हे पूर्णपणे अमान्य आहे. आमचे खाते पूर्ववत करावे”, अशी पोस्ट सौरव दास यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली आहे.
दास यांच्या विविध पोस्ट हटवल्याचा आरोप
सौरव दास यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दोन फोटो देखील दिले आहेत. यात एका पोस्टमध्ये त्यांनी ‘दिमागी नक्सल’वरुन टीका केल्याची पोस्ट आहे. या पोस्टला संवेदनशील मजकूर असे नोटिफिकेशन आली आहे. तर, दुसऱ्या फोटोत आतापर्यंत हटवण्यात आलेल्या पोस्टची माहिती दिलीय.
