Delhi CJP Parliament March Updates: गेल्या २० दिवसांपासून सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते. शनिवारी भल्या सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना सक्तीने आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यापाठोपाठ सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके जंतरमंतरवर उपोषणाला बसले. सोमवारी सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातूनही २० जुलै रोज संसदेवर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं.
आज दिल्लीत पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.
CJP Chalo Sansad March LIVE: राजधानी दिल्लीत CJP च्या 'चलो संसद' मोर्चाची चर्चा!
VIDEO: 'आंदोलन करून काय साध्य होणार?' हेमा मालिनींचा सवाल; कंगना रणौतचे विरोधकांना आव्हान
"२३ व्या दिवशीही माझं उपोषण सुरूच राहील..." रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी काय संदेश दिला?
"युवा नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला इथे रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे", असे सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे.
जे. पी. नड्डांसोबत CJP च्या प्रतिनिधींची ५ तासांची प्रदीर्घ बैठक; केल्या 'या' ३ प्रमुख मागण्या, बैठकीनंतर नड्डा म्हणाले…
१. सोनम वांगचुक यांना तातडीने सोडण्यात यावं. त्यांना एक व्हिडीओ बनवण्याची परवानगी दिली जावी.
२. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. जोपर्यंत राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.
३. ज्या २० नीट परीक्षार्थींनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची नुकसानभरपाई मिळावी.
CJP Protest at Delhi: आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जे. पी. नड्डांची घेतली भेट
CJP आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना आपलं निवेदन दिलं. यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची आपली अट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. त्याशिवाय, योग्य स्तरावर या मागणीबाबत चर्चा करू, असं आश्वासन जे. पी. नड्डांनी दिल्याचं सीजेपीचे प्रवक्ते सौरव राव यांनी एक्स हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
VIDEO: "कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी", चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान; म्हणाले, "पेपर काय धर्मेंद्र प्रधानांनी फोडला का?"
संसद भवन परिसरात कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली असून पोलिसांकडून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांना अटक केल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हे वृत्त फेटाळून लावले आहे. "सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना अटकही केलेली नाही किंवा त्यांना ताब्यातदेखील घेतलेले नाही. पण दिल्लीतील केरला हाऊसजवळ अजूनही मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाले आहेत."
अभिजीत दिपकेंचे नागपूरच्या जनतेला आवाहन आणि भर पावसात रस्त्यावर तरुणाईसह वृध्द महिलाही…
CJP Chalo Sansad LIVE Updates: धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला
एकीकडे CJP चे आंदोलक संसद भवनाच्या दारापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात असताना दुसरीकडे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीमध्ये नेमकी CJP आंदोलनाची चर्चा होते किंवा संभाव्य उपायांवर बोलणं होतं, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
CJP Chalo Sansad LIVE Updates: सीजेपीच्या आंदोनावर राज्यसभेत गोंधळ, कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब
CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच राज्यसभा २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP चे आंदोलक जंतरमंतरवरून आता संसद भवन परिसरा पोहोचले आहेत. रेल भवनच्या बाजूच्या गेटजवळ हे आंदोलक पोहोचले असून तिथे पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास संसदेच्या दाराशीच आंदोलकांचा गोंधळ चालू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
CJP Chalo Sansad LIVE Updates: सोनम वांगचुक यांच्य विनंतीनंतर अभिजित दिपकेंनी बेमुदत उपोषण मागे घेतलं
सोनम वांगचुक यांना शनिवारी आंदोलनस्थळावरून रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपकेंनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. आज संसद मार्चच्या दिवशी सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजीत दिपकेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे.
'माझी प्रकृती उत्तम, संसदेवरील मोर्चात जाऊ द्या'; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र, 'नजरकैदेत' ठेवल्याचा आरोप!
आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता... इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध! दिल्ली मध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. २० दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतली नाहीच मात्र सोनम वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. आपली चूक सरकार मान्य करत नाहीच मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत - रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार
Sonam Wangchuk Writes to Hospital: मला बरं वाटतंय, मोर्चासाठी जाऊ द्या - सोनम वांगचुक
मला आज बरं वाटत असून माझ्या प्रकृतीसंदर्भातील सर्व मानकंदेखील सामान्य दिसत आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया मला रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी. तात्पुरती का असेना, जेणेकरून मी संसद मोर्चामध्ये सहभागी होऊ शकेन.
सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते
मूळ विषय NEET चा होता. त्यासंदर्भात कारवाई झाली. पुनर्परीक्षाही झाली. CJP या सगळ्या गोष्टी बघत नाहीये का? आम्हाला हे समजत नाहीये.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल
बेस्टची दुभाजकाला धडक एका पादचाऱ्याचा मृत्यू वाहक-चालक जखमी, सायन-पनवेल महामार्गावरील घटना
समृद्धी महामार्ग दुपारी तासभर वाहतुकीसाठी बंद
Loksabha Chaos on CJP Protest: सीजेपी आंदोलन व NEET पेपर फुटीवरून लोकसभेत गदारोळ
सीजेपीनं दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्याचं केलेलं आवाहन आणि NEET पेपर फुटी या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज पहिल्याच दिवशी सुरू होताच तासाभरासाठी स्थगित करणम्यात आलं.
CJP Chalo Sansad March LIVE: सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांचं आंदोलकांना आवाहन
तीन गोष्टी आज महत्त्वाच्या आहेत.
१.आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने व्हायला हवं.
२. आपण शिक्षणाचा मुद्दा मांडला आहे, त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं.
३. सगळ्यांनी आंदोलन करताना सतर्क राहायला हवं. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये.
गीतांजली आंगमो, सोनम वांगचुक यांच्या पत्नी
सोनम वांगचुक यांची पोस्ट चर्चेत; "मी उपोषण सोडायला तयार पण माझ्या या तीन अटी मान्य कराव्यात"
CJP at Jantar Mantar Delhi: जंतरमंतरवरील आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज
दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठ्या संख्येनं CJP चे आंदोलक जमा होऊ लागले आहेत. संसद मार्चचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी हे आंदोलक जमा झाले आहेत. आंदोलकांना आवरताना तिथे निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे पोलिसांना आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
CJP Chalo Sansad LIVE Updates: सरकारवर प्रचंड दबाव - कॉकरोच जनता पार्टी
सोमवारी जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, मोर्चाबाबतची पुढील माहिती आयोजक लवकरच जाहीर करतील. "मोर्चाबाबतची पुढील माहिती आम्ही काही वेळातच देऊ. मला एवढेच सांगायचे आहे की सरकारवर प्रचंड दबाव आहे आणि तेच आमच्यासाठी एक मोठे यश आहे," असे रांका यांनी म्हटले.
CJP Chalo Sansad March LIVE: दिल्ली पोलिसांची विशेष सुरक्षा तैनात
1) नवी दिल्ली, मध्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीतील काही भागांमध्ये बहुस्तरीय बॅरिकेड्स, सीसीटीव्ही निगराणी, बॉम्बशोध पथकांकडून तपासणी आणि गस्त वाढवली आहे.
2)जंतरमंतर, संसद मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
3)कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
CJP Chalo Sansad March LIVE: सीजेपीच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचं निवेदन
नवी दिल्ली भागात कलम १६३ म्हणजे जमावबंदी लागू असल्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा सभा घेण्यास बंदी आहे. फक्त जंतर-मंतर येथे, आधी परवानगी घेऊनच आंदोलन करता येईल, असे पोलिसांनी निवेदनात नमूद केले आहे.
CJP Chalo Sansad March LIVE: सीजेपीच्या संसद मोर्चाला दिल्ली पोलिसांची परवानगी नाही
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी (२० जुलै) कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) ‘चलो संसद’ मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी रविवारी स्पष्ट केले.
संसदेवरील मोर्चावेळी तणाव? पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस हस्तक्षेपाची शक्यता
दिल्लीच्या संसद भवनाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. CJP च्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. संसदेकडे प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजीव चौक, जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ या मेट्रो स्थानकांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
CJP Chalo Sansad March LIVE: संसद परिसरात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चोख बंदोबस्त
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP कडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संसद भवनाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व मार्गांवक कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

CJP Chalo Sansad March LIVE: सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा संसदेवर मोर्चाचा नारा
