CJP Delhi Jantar Mantar Protest 11 October Updates: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सीजेपी (CJP) नेत्यांनी रविवारी व्यक्त केला. दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलकांनी आंदोलन केले. तसंच, हे लोण मुंबईतही पसरलं. मुंबईतही ठिकठिकाणी आंदोलने केल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, ठाकरे बंधू या आंदोलनात उतरल्याने त्यांना सोडून देण्यात आलं. खुद्द अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी रस्त्यावर उतरत आंदोलकांना पाठिंबा दिला.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची रविवारी सकाळी सुटका करण्यात आली. २४ तासांनी त्यांची सुटका करण्यात आली असून न्यायालायने त्यांना एक अटही घातली. वर्षभर कोणतीही शांतता भंग करता येणार नाही, या अटीवर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. मात्र, मी कोणत्याही बॉन्डवर सही केली नसल्याचं अभिजीत दिपकेंनी स्पष्ट केलं असून आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही मागे हटणार नाही! आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही पुन्हा जंतरमंतरवर मोर्चा काढू आणि तिथेच थांबू”, असं कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं. तर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेत नाही, तोवर घरी परतणार नसल्याचं सीजेपीचे नवे प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी जाहीर केलं.

निवडणूक आयोगाच्या विरोधातील निदर्शनांमुळे दिल्लीत जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, शनिवारी अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, पिनाराई विजयन, नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राजधानीतून सुमारे ६ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले होते आणि कोणत्याही आंदोलकाला जंतरमंतरपर्यंत पोहोचू दिले जात नव्हते. दरम्यान आजही त्याच जोषाने जंतर मंतरवर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही, तोपर्यंत घरी परतणार नसल्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीने केल्याचं अजिंक्य शिंदे म्हणाले.

दिल्लीतील शनिवारच्या आंदोलनापूर्वी आणि त्यादरम्यान आंदोलक, नागरी समाजाचे सदस्य, वकील आणि पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतल्याच्या वृत्तांबद्दल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने चिंता व्यक्त केली होती, त्याला शनिवारी भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

कॉक्रोच जनता पार्टीने पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते आंदोलन पुढे सुरूच ठेवणार असून अधिक आक्रमकतेने आंदोलन करणार आहेत. तसंच, आंदोलन करणार नसल्याच्या कोणत्याही बॉन्डवर सही केली नसल्याचं अभिजीत दिपकेंनी स्पष्ट केलं.

Live Updates
20:09 (IST) 11 Oct 2026

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर आदित्य, तेजस आणि अमित ठाकरे आक्रमक

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातून आंदोलकांची सुटका झाल्यानंतर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; उद्याही शांततेत आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट.

https://twitter.com/ANI/status/2109282677753074154

20:04 (IST) 11 Oct 2026

तरुण कर्तव्य बजावत आहेत, तर पोलीस मालकाचा आदेश पाळत आहेत, तुषार गांधींची टीका

आपल्या घटनात्मक लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुष अत्याचार करून मुंबई पोलीस स्वतःची 'कीर्ती' मिरवत आहे. तरुण आपले कर्तव्य बजावत आहेत, तर पोलीस आपल्या मालकाच्या आदेश पाळत आहेत - तुषार गांधी

https://twitter.com/TusharG/status/2109278700676198653

19:53 (IST) 11 Oct 2026

"पहाटे साडेतीन वाजता वडिलांना फोन का करायला लावला?" दिल्ली पोलिसांच्या VIDEO वर अभिजीत दिपकेंचा पलटवार, गंभीर आरोप

Abhijeet Dipke Police Detention Video Response : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे अध्यक्ष अभिजित दिपके यांचा व्हिडिओ जारी केल्यानंतर दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ...सविस्तर बातमी
19:10 (IST) 11 Oct 2026

"घाबरू नका", राहुल गांधींचा उद्या सर्वोच्च न्यायालयात मोर्चा

मतदान चोरी थांबवणे, मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रिया रोखणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विरोधी पक्ष सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढतील, अशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घोषणा केली.

'X' वरील एका पोस्टमध्ये गांधी यांनी आरोप केला की, शनिवारी दिल्लीत जमा झालेल्या आंदोलकांना पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ते म्हणाले की, हा मोर्चा पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणेल आणि भारताच्या सरन्यायाधीशांना एक निवेदन सादर केले जाईल. लोकांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन करताना गांधी म्हणाले, "डरो मत" (घाबरू नका).

https://twitter.com/RahulGandhi/status/2109271519373545893?s=20

18:56 (IST) 11 Oct 2026

रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच, अभिजीत दिपकेंची घोषणा

अभिजीत दिपके हे दिल्लीहून मुंबईत आले आहेत. त्यांनी मुंबईत उतरताच आंदोलन करणारच असा नारा दिला आहे. तसंच दिल्ली पोलिसांनी मुळीच माणुसकी दाखवली नाही असा आरोप केला आहे. तसंच दिल्ली पोलिसांमध्ये गुंड आहेत, त्यांच्याकडे माणुसकी नावाची गोष्ट नाही असंही अभिजीत दिपके म्हणाले आहेत. आम्ही या कुणाच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही असंही दिपके यांनी म्हटलं आहे. आंदोलनाबाबत विचारलं असता अभिजीत दिपके म्हणाले, आम्ही कुणालाही काहीही लिहून दिलेलं नाही. लवकरच रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार आहोत. आजी वारली आहे म्हणून मी दिल्लीहून मुंबईत आलो आहे. प्रत्येकाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण नरेंद्र मोदी म्हणजे हुकूमशाह आहेत, नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही संपवावी लागणार आहे. कारण आपण पाहिलं एका ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्ली बंद केली. रस्ते बंद केल्या, मेट्रो बंद केल्या, सगळं बंद करून टाकलं. ७०-८० वर्षांच्या इतिहासात असं घडलं नाही.

17:29 (IST) 11 Oct 2026

"मुंबई पोलिसांना आता वरच्या स्तरावरून आदेश आलेत", आंदोलकांना ताब्यात घेतल्याने आदित्य ठाकरे संतापले

भाजप इतकी धास्तावली आहे की, मुंबईतही ते एका राजवटीविरोधात शांततेने पण निर्भयपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहेत. असे दिसते की, मुंबई पोलिसांना आता अगदी वरच्या स्तरावरून आदेश पाळायला लावले जात आहेत - अगदी त्या वरच्या स्तरावरून, जो पोलीस दलाच्या अडथळ्यांमागे लपलेला आहे. तुम्हा सर्वांना कुठे नेले जात आहे, हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही येत आहोत. तसेच, आम्ही कायदेशीररित्या तुमच्या पाठीशी उभे राहू- आदित्य ठाकरे</p>

https://twitter.com/AUThackeray/status/2109244716307087458

17:08 (IST) 11 Oct 2026

Video: "दिल्लीतील CJP आंदोलनावरील UN ची टिप्पणी अनावश्यक अन् दुटप्पी", अंतर्गत बाबींत हस्तक्षेप नको म्हणत परराष्ट्र मंत्रालयाची टीका!

पाकिस्तानसारख्या शेजारील देशांमध्ये आंदोलकांवर होणारे हिंसक अत्याचार आणि फ्रान्ससारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये आंदोलनांवर पोलिसांकडून होणाऱ्या कठोर कारवायांवर हा आयोग मूग गिळून गप्प राहतो, असा टोला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लगावला. ...सविस्तर वाचा
16:55 (IST) 11 Oct 2026

"आंदोलन करणार नाही, अशा कोणत्याही पेपरवर सही केलेली नाही", अभिजीत दिपकेंचं स्पष्टीकरण

"आम्ही आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही बंधपत्रावर (बॉण्डवर) स्वाक्षरी केलेली नाही. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू." - अभिजीत दिपके

https://twitter.com/abhijeet_dipke/status/2109236712283234411

16:46 (IST) 11 Oct 2026

ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

https://twitter.com/aisa_official_/status/2109228710897533397

16:24 (IST) 11 Oct 2026

CJP Protest Live :

राजीव चौक मेट्रो स्टेशनवर आंदोलक जमले आहेत.

15:08 (IST) 11 Oct 2026

"लढाई आता सुरू झाली", अटकेतून सुटल्यानंतर CJP चे नेते अधिक आक्रमक; मोदी-शहांनी युद्ध सुरू केल्याचा दावा!

CJP Protest Modi Shah update : दिल्लीतील आंदोलनांवरील पोलिसांच्या कठोर कारवाईनंतर 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) ने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...अधिक वाचा
14:40 (IST) 11 Oct 2026

LIVE : "आता खऱ्या लढाईला सुरुवात!" पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांवर CJP चा हल्लाबोल, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सीजेपी (CJP) नेत्यांनी रविवारी व्यक्त केला. दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईदरम्यान, “ही लढाई आता सुरू झाली आहे,” असं त्यांनी म्हटलं. सुरक्षा व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी सांगितलं की, परिस्थितीला युद्धासारखे स्वरूप येऊ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लाज वाटली पाहिजे.

https://www.youtube.com/live/jWjenBme3HY

14:31 (IST) 11 Oct 2026
"मोदींनी आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, पण अभिजीत तसा नाही", आजीच्या निधनाविषयी कळल्यावर पोलीस कसे वागले? रांकाने सगळंच सांगितलं!

अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन झाले. ही बातमी त्याला कळवण्यात आली तेव्हाही पोलिसांनी अमानवी वर्तन केले. त्यांच्या या कृत्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. दिपके वारंवार सांगत होता, माझे पालक लगेच घाबरतात, ते हृदयविकाराचे रुग्ण आहेत, माझ्या भावाशी बोलू द्या. मात्र दिल्ली पोलिसांनी कोणतीही दया दाखवली नाही.आज अभिजीत अंतिम दर्शनसाठी गावी जात आहे. पण आम्ही हे स्पष्ट सांगतो की ही लढाई आता सुरू झाली आहे. अभिजीत दिपकेला वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करायला आवडत नाही. महामानवाने आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, पण अभिजीत तसा नाही - आशुतोष रांका

13:17 (IST) 11 Oct 2026

आजीचं निधन झाल्याचं कळताच अभिजीत दिपके घरी परतणार; CJP च्या भूमिकेबाबतही दिली महत्त्वाची माहिती

या दुःखाच्या प्रसंगात माझ्या कुटुंबासोबत राहण्यासाठी मी माझ्या गावी परतत आहे. सौरव आणि आशु थोड्याच वेळात दिल्लीत पत्रकार परिषद घेतील. कॉक्रोच जनता पार्टी मागे हटणार नाहीत आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. १० ऑक्टोबर हा दिवस या हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून इतिहासात नोंदवला जाईल. - अभिजीत दिपके

https://twitter.com/abhijeet_dipke/status/2109181707207545238

13:09 (IST) 11 Oct 2026

LIVE : "शांततेने एकत्र जमलेल्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊ नका" सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या बेकायदेशीर अटकेच्या आणि पोलिसांच्या अरेरावीच्या दाव्यांवर सरकारकडून उत्तर मागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रविवारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, शांततापूर्ण मार्गाने एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले जाणार नाही याची खात्री करावी, तसेच कोणतीही अटक ही कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीनुसारच झाली पाहिजे यावर भर दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांची अरेरावी आणि बेकायदेशीर अटकेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश आला आहे.

13:01 (IST) 11 Oct 2026

"मला ताब्यात घेतलं नव्हतं, अटकही केली नव्हती", सुटका होताच ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, भारतीय पासपोस्ट दाखवत म्हणाला...

Dhruv Rathee Detained Truth statement : "मला ताब्यात घेतलं नव्हतं आणि अटकही केली नव्हती," असं स्पष्ट करत ध्रुवने थेट आपला भारतीय पासपोर्ट दाखवला. ...सविस्तर बातमी
12:24 (IST) 11 Oct 2026

मेट्रो, रेल्वे का बंद केली होती? मंगळवारपर्यंत उत्तर द्या; न्यायालयाचे सरकारला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंगळवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले, तसेच दिल्ली मेट्रो नियमित वेळापत्रकानुसार चालवण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने रविवारी केंद्र सरकारला दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांबाबत मंगळवारपर्यंत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच मेट्रो सेवा त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानाच्या कलम १९(२) अंतर्गत नमूद केलेल्या सार्वजनिक सुव्यवस्थेच्या अटीच्या अधीन राहून हे नियमित वेळापत्रक लागू राहील.

12:23 (IST) 11 Oct 2026

दिल्ली मेट्रो स्थानकांचा नकाशा आणि रेल्वे परिपत्रके दाखवा, न्यायालयाची मागणी

आंदोलनाशी संबंधित निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली मेट्रो स्थानकांचा नकाशा आणि रेल्वे परिपत्रके मागवली आहेत.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, १० ऑक्टोबर रोजी दिल्ली मेट्रोच्या एकूण सेवेमध्ये कोणतीही कपात करण्यात आली नव्हती. तसेच मेट्रो नेटवर्कच्या ३०३ स्थानकांपैकी केवळ १५ टक्के स्थानकांवरच प्रवेश आणि बाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले होते.

सुरुवातीला ५७ स्थानकांवर याचा परिणाम झाला होता, असे नमूद करत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी या निर्बंधांवर न्यायालयाला स्पष्टता हवी असल्याचे सांगितले आणि नकाशावर या स्थानकांची ठिकाणे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मेहता यांनी सांगितले की, शनिवारी रात्री १० वाजेपासून सर्व मेट्रो स्थानके खुली करण्यात आली असून रविवारी एकही स्थानक बंद नव्हते. न्यायालयाने या निर्बंधांच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या रेल्वे परिपत्रकांची माहितीही मागवली आहे.

12:21 (IST) 11 Oct 2026

न्यायालयाजवळ प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील आंदोलनावरील निर्बंधांविषयीच्या याचिकांवर सुनावणी घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने रविवारी दिल्लीतील वाहतूक आणि आंदोलनाच्या अधिकारावरील निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेतली. हे न्यायालय असलेल्या भगवान दास मार्ग येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना ही सुनावणी पार पडली. पोलीस कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना वकील जय अनंत देहाडराय म्हणाले की, आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनाही हिंसेचा सामना करावा लागला होता. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी स्पष्ट केले की, न्यायालये व्यक्तीबाबत तटस्थ राहतात. ते पुढे म्हणाले की, संबंधित व्यक्ती सामान्य नागरिक असो वा पोलीस अधिकारी, "जीवन आणि स्वातंत्र्य सर्वांसाठी समान रीतीने संवेदनशील असते."

तसंच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्लीतील मेट्रो सेवा सुरळीत सुरू ठेवण्याचे आणि इंटरनेट सेवा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने रविवारी केंद्र सरकारला निर्देश दिले की, दिल्लीतील मेट्रो सेवा त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील आणि इंटरनेट सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करावी.

यासोबतच, वकिलांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्यांचे पालन करण्यापासून रोखले जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

11:29 (IST) 11 Oct 2026
LIVE : २४ तासांनी जामिनावर सुटका होताच अभिजीत दिपकेंचं पहिलं ट्वीट, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं लक्ष्य

पंतप्रधान म्हणून मोदींनी लाज आणली आहे. या देशाने यापूर्वी कधीही इतका मोठा भ्याड आणि जुलमी माणूस पाहिला नाही - अभिजीत दिपके

https://twitter.com/abhijeet_dipke/status/2109159995975807043

11:27 (IST) 11 Oct 2026

"वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही"; कोर्टाच्या अटीवर दिपके, दास आणि रांका यांची २४ तासांनी सशर्त सुटका; CJP चं पुढचं पाऊल काय?

Dipke Das Ranka released court bail : . न्यायमूर्तींनी लावलेल्या कडक अटींनुसार, वर्षभर कोणतीही शांतताभंग करणारी कृती न करण्याच्या हमीवर दिपके, दास आणि रांका यांची २४ तासांत सुटका झाली आहे. ...सविस्तर बातमी
11:18 (IST) 11 Oct 2026

LIVE : "आम्ही राष्ट्राच्या सेवेत आहोत”, आंदोलकांवर सरकारने केलेल्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

१० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी सुरू केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर, दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईविरुद्धच्या याचिकांवर, तसेच न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या अवमान याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आंदोलन प्रकरणांवर ज्या वकिलांना आपल्या याचिकांचा उल्लेख (मेन्शन) करायचा आहे, त्या सर्व वकिलांचे म्हणणे ऐकून घेण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

न्यायालयाने म्हटले की, “दोन बाबी सध्या आमच्यासमोर आहेत. असे काही वकील आहेत ज्यांना अद्याप सूचीबद्ध (unlisted) नसलेल्या याचिकांचा उल्लेख करायचा आहे. आमचा विचार असा आहे की, आम्ही (बारमधील) उजवीकडून डावीकडे जात प्रत्येक पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी देऊ.”

या मुद्द्यांवर विशेष सुनावणी घेतल्याबद्दल जेव्हा वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले, तेव्हा न्यायमूर्ती बागची म्हणाल्या, “आमचे आभार मानण्याची गरज नाही. आम्ही नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर आहोत.”

अवैधपणे ताब्यात घेणे आणि कलम १६३ लागू करण्याच्या आदेशाविरोधात ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. सिबल म्हणाले की, रेल्वे इत्यादींमधून लोकांना पकडले जात आहे. याशिवाय इंटरनेट सेवा खंडित करण्याचाही मुद्दा आहे.

https://twitter.com/ANI/status/2109156199350566996?s=20

10:50 (IST) 11 Oct 2026

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका कॅन्ट पोलीस ठाण्यातून पडले बाहेर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतर मंतर येथे पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) नेते अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. आता रविवारी त्यांची सुटका करण्यात आली. ते दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.

https://twitter.com/IndianExpress/status/2109147785543192629?s=20

10:48 (IST) 11 Oct 2026
कॉक्रोच जनता पार्टीकडून दुपारी २ वाजता पत्रकार परिषद

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने अटीवर सोडलं आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचं नेमकं म्हणणं काय आहे? असा प्रश्न आहे. यासंदर्भातील दुपारी २ वाजता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद होणार आहे.

10:38 (IST) 11 Oct 2026

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची २४ तासांनी सुटका, न्यायालयाने 'या' अटीवर दिला जामीन

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची २४ तासांनी सुटका करण्यात आली आहे. मात्र, पुढील वर्षभर या तिघांना शांततेचा भंग करता येणार नाही, या अटीवर तिघांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2109144587336139257

10:37 (IST) 11 Oct 2026

CJP च्या कायदेशीर सल्लागार रतना सिंग यांची महत्त्वाची माहिती

वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही, या अटीवर तिघांची सुटका

https://twitter.com/whattalawyer/status/2109143048043262458

10:33 (IST) 11 Oct 2026

अभिजित दिपके, सौरव दास,आशुतोष रांका यांची २४ तासानंतर सुटका

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रंका आणि सौरव दास यांना प्रतिबंधात्मक अटकेनंतर रविवारी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यातील कार्यकारी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. शनिवारी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईहून दिल्लीत उतरताच या तिघांना एअर इंडियाच्या विमानातच ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती देण्यात आली आणि त्यांना घरी जाण्यासाठी मदतीची ऑफर दिली गेली. दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केलेले सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी सांगितले की, "ज्ञानेश कुमार जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.

10:03 (IST) 11 Oct 2026

अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका न्यायालयात हजर

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या तिघांना मुंबईहून दिल्लीला जे विमान शनिवारी आलं त्या विमानातूनच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता या तिघांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं गेलं आहे. अद्याप न्यायदंडाधिकारी पोहचणं बाकी आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

09:57 (IST) 11 Oct 2026

आशुतोष, सौरव आणि अभिजीत न्यायालयात हजर

आशुतोष, सौरव आणि अभिजीत न्यायालयात हजर झाले असून ते कार्यकारी दंडाधिकारी येण्याची वाट पाहत आहेत.

https://twitter.com/whattalawyer/status/2109132272305938449