India Bloc Supreme Court March Updates, 12 October 2026 : दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मागचे दोन दिवस CJP च्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रविवारी त्यांची सुटका करण्यात आली. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीचे खासदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्लीत आज सहा मेट्रो स्टेशन या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहेत. इंटरनेट सेवा मात्र सुरू राहणार आहे. दिल्लीतल्या पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, बाराखंबा ही स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. सकाळी ६ ते दुपारी ४ या वेळेत ही स्टेशन्स बंद राहणार आहेत. आज या आंदोलनात काय काय घडणार? या सगळ्या घडामोडी जाणून घेऊ लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
CJP Delhi Protest Today Live: Latest Updates on Jantar Mantar, INDIA Bloc March India Gate to Supreme Court Gyanesh Kumar Resignation Demand : इंडिया आघाडीचे खासदारही रस्त्यावर, यासह महत्त्वाच्या घडामोडी
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर पोलिसांनी रोखला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार पुन्हा परतले आहेत.
“कितीही निदर्शने केली तरी ज्ञानेश कुमार…”; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, अभिजीत दिपकेंना दिला ‘हा’ सल्ला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज देखील काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर पोलिसांनी रोखला होता. मात्र, आता राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. यावेळी अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.
मुंबईतही ठाकरे बंधूंचा मोर्चा, मनसेकडून स्वाक्षरी मोहमेला सुरुवात
मुंबईतील दादरमध्ये ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा निघाला आहे. मनसेकडून दादरमध्ये स्वाक्षरी मोहमेला सुरुवात करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारा इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर पोलिसांनी रोखला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या प्रमुखांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबईत ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा, राज ठाकरेही मोर्चात सहभागी
मुंबईतील दादरमध्ये ठाकरे बंधूंच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात राज ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्यावतीने आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ मोर्चा काढण्यात येत आहे.
राहुल गांधींच्या लीगल टीमकडून याचिका दाखल, तर मुंबईतही ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा
काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्यावतीने आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी सर्व विरोधी खासदारांसह राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ पोहोचले असून आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन सीआरपीएफचे जवान दिल्लीत तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच राहुल गांधींच्या लीगल टीमकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईतील दादरमध्ये ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा सुरू करण्यात आला आहे.
"सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे कोणत्या संविधानात लिहिलंय", देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींसह विरोधकांवर टीका
सर्वोच्च न्यायालयाजवळ इंडिया आघाडीचा मोर्चा, महाराष्ट्रातील नेतेही आंदोलनात सहभागी
काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ मोर्चा काढण्यात आला आहे. सर्व विरोधी खासदारांसह राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ पोहोचले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झाली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयाजवळ मोर्चा
काँग्रेस आणि इंडिया आघाडीसह आणखी काही विरोधी पक्षांनी एकत्र येत आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आहे. सर्व विरोधी खासदारांसह राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ पोहोचले आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आजही इंडिया आघाडीसह आणखी काही विरोधी पक्षांनी एकत्र येत आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या दरम्यान ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात विरोधकांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा मोर्चा, प्रियांका गांधी, नेहा बोरांसह अनेक नेते सहभागी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधीआणि नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात विरोधी पक्षांचे नेते आणि शेकडो समर्थक सहभागी झाले होते.
"आता संपूर्ण देश जंतर-मंतर बनेल!", अधिकृत जागांच्या यादीतून नाव हटवताच अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
"अनेक वर्षे लागली तरी मागे हटणार नाही", सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यानंतर राहुल गांधी आक्रमक; तरुणांना केलं महत्त्वाचं आवाहन
१८ पोलीस अन् ३ SUV, अभिजीत दिपकेंसह तिघांना विमानातूनच पोलिसांनी कसं ताब्यात घेतलं; वाचा इनसाइड स्टोरी
राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. मतचोरीच्या आरोपांविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीसह आणखी काही विरोधी पक्षांनी एकत्र येत आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राहुल गांधी हे सर्व विरोधी खासदारांसह सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने पायी निघाले आहेत.
राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. मतचोरीच्या आरोपांविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीसह आणखी काही विरोधी पक्षांनी एकत्र येत आज (१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राहुल गांधी हे सर्व विरोधी खासदारांसह सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघाले आहेत.
राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आहे. राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधीही आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालय परिसरात बरीच गर्दी झालेलीही दिसून येते आहे.
'मोदी-शाहांच्या अहंकारामुळे संपूर्ण देश पेटला', सौरव दास याची टीका; संविधान बदलून दाखवण्याचं दिलं आव्हान
‘हे शिवतांडव, यात कोणीही सहभागी होऊ शकतं’; राहुल गांधींचं दिल्लीतील आंदोलनाबाबत वक्तव्य
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरसह आणखी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासह विरोधी पक्षातले खासदार, सीजेपीचे कार्यकर्ते आहेत, तसंच नेहा बोराही या आंदोलनात सहभागी झाली आहे.
दिल्लीत राबवला जातोय गुजरात पॅटर्न, खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका
संजय राऊत यांनी दिल्लीतील ज्ञानेश कुमार आंदोलनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या आंदोलनात एक ट्विस्ट आल्याचे त्यांनी म्हटले असून, आंदोलकांना रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांना गणवेश देऊन रस्त्यावर उतरवण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राऊत यांनी प्रश्न विचारला की, आंदोलनाच्या परिसरात खाकी पोलीस वर्दीने भरलेल्या गाड्या कोणासाठी होत्या? नेमप्लेट नसलेले जे पोलीस दिसत होते, ते अशी वर्दी घातलेले गुंड होते, असेही त्यांनी म्हटले आहे. रस्त्यावर गुंडागर्दी करताना आणि महिला-मुलींवर हात टाकताना दिसलेले हे पोलीस भाजपचे आणि अमित शाह यांचे नकली पोलीस होते, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. या कृतीला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पॅटर्न असे संबोधले आहे. दिल्लीतील ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात शासनाने भाडोत्री गुंडांचा वापर केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून, या प्रकारावर त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
दिल्लीत भाजपाचा गुजरात पॅटर्न राबवला जातोय, संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत यांनी दिल्लीतील ज्ञानेश कुमार आंदोलनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या आंदोलनात एक ट्विस्ट आल्याचे त्यांनी म्हटले असून, आंदोलकांना रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांना गणवेश देऊन रस्त्यावर उतरवण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राऊत यांनी प्रश्न विचारला की, आंदोलनाच्या परिसरात खाकी पोलीस वर्दीने भरलेल्या गाड्या कोणासाठी होत्या? नेमप्लेट नसलेले जे पोलीस दिसत होते, ते अशी वर्दी घातलेले गुंड होते, असेही त्यांनी म्हटले आहे. रस्त्यावर गुंडागर्दी करताना आणि महिला-मुलींवर हात टाकताना दिसलेले हे पोलीस भाजपचे आणि अमित शाह यांचे नकली पोलीस होते, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. या कृतीला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पॅटर्न असे संबोधले आहे. दिल्लीतील ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात शासनाने भाडोत्री गुंडांचा वापर केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून, या प्रकारावर त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
सिंहासन खाली करो म्हणत शशी थरूर यांनी केली पोस्ट
शशी धरुर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता लिहिली आहे. दिनकर यांची जनतंत्र का जन्म ही कविता प्रसिद्ध आहे. हीच कविता शशी थरूर यांनी पोस्ट केली आहे. शशी थरूर म्हणतात, "लेकीन होता भूडोल, बवंडर उठते है, जनता जब कोपा कुल हो भृकूटि चढाती है. दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है" दिनकर यांच्या कवितेच्या ओळी शशी थरूर यांनी पोस्ट केल्या आहेत. तसंच त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मोर्चाची माहिती दिली आहे.
"ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात", राहुल गांधींचा मोठा दावा; म्हणाले, "ते मुख्य गुन्हेगार नाहीच!"
विरोधक संविधान विरोधी आहेत हे पुन्हा सिद्ध झालं-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधक संविधानाची भाषा करत आहेत. हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे की देशाचे सरन्यायाधीश आंदोलकांना भेटतात? सर्वोच्च न्यायालय जे म्हणालं ते योग्य आहे तुम्ही कोर्टात या तिथे लढता येईल. मी कायमच सांगत आलोय की हे सगळे संविधान विरोधी लोक आहेत. सरन्यायाधीशांनी संवैधानिक अधिकारांच्या आधारेच हे सांगितलं आहे की मी यांना भेटू शकत नाही. त्यानंतर हे लोक सरन्यायाधीशांना शिव्या देत आहेत. ही कुठली पद्धत आहे? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे
मोदी सरकार ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, चांगलं आहे-राहुल गांधी
दिल्लीला एखाद्या छावणी किंवा किल्ल्याचं स्वरूप आलं आहे. सगळीकडे ३० हजार पोलीस आहेत. आम्हाला वाटतं आहे की २० हजार ३० हजार पोलीस रस्त्यावर उभे रहावेत.कारण सरकार खूप मोठी चूक करतं आहे. आम्ही देशाला हे दाखवून देऊ इच्छितो की मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवतं आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ठराव मांडणार; खुद्द मुख्यमंत्रीच देणार प्रस्ताव
आता आम्ही पोलिसांकडूनच आंदोलनाची तारीख मागू - सौरव दास
शांततेत आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. त्यामुळे लोक शांततेत आंदोलन करतील. पोलीस म्हणत आहेत की १० दिवस आधी परवानगी घ्यायला या. त्यामुळे आम्ही पोलिसांकडून आंदोलनाची तारीख मागत आहोत. आम्ही २४ तासांचा अल्टिमेटम देत आहोत- सौरव दास
सर्वोच्च न्यायालय परिसरात ३० हजार पोलीस तैनात
सर्वोच्च न्यायालय परिसरात इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. त्या अनुषंगाने दिल्ली हाय अलर्टवर आहे. ३० हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत.
दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मागचे दोन दिवस CJP च्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रविवारी त्यांची सुटका करण्यात आली. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आली. (Express Photo by Praveen Khanna)
