CJP Delhi Jantar Mantar Protest Updates: निवडणूक आयोगाच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला रोखण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप दिले होते. शनिवारी आंदोलन करत असताना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, पिनाराई विजयन यांच्यासह नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण या प्रमुख विरोधी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. संध्याकाळी सात वाजेपर्यंत राजधानीत सुमारे ६,००० जणांची धरपकड करण्यात आली होती. कडेकोट बंदोबस्तामुळे एकाही आंदोलकाला आंदोलनाचे मुख्य ठिकाण असलेल्या जंतरमंतरपर्यंत पोहोचू देण्यात आले नाही.

पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची रविवारपर्यंत सुटका न झाल्यास उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास नेहा बोरा आणि काही इतर कार्यकर्त्यांची मैदान गढी पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली.

सीजेपीचा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमान लँड होताच विमानामध्येच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याचे त्यांना कळवण्यात आले असून त्यांना घरी परतण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे.

दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट करत, “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा दिला.

CJP leaders Abhijeet Dipke, Saurav Das, Ashutosh Ranka detained at Delhi Airport Live Updates

Live Updates
19:42 (IST) 10 Oct 2026

ऑगस्ट क्रांती मैदानानंतर डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन; तुषार गांधींच्या सुटकेसाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर

तुषार गांधींसह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ अंधेरीत महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी ...सविस्तर वाचा
18:48 (IST) 10 Oct 2026

CJP Mumbai Protest Live Updates: बॉलिवूड अभिनेते इम्रान खान यांच्यासह मुंबईतून ४०० आंदोलक ताब्यात, दिल्लीनंतर मुंबईतही कारवाई

अभिनेते इम्रान खान यांना मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील आंदोलन स्थळावरून अटक करण्यात आली आहे. दिल्लीत आंदोलन दाबल्याची प्रतिक्रिया देशभरात उमटली असून मुंबईतही ठिकठिकाणी आंदोलन झाले असून ४०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2108906152906121259

18:41 (IST) 10 Oct 2026

दिल्लीला वेठीस धरू देणार नाही, रेखा गुप्तांचा विरोधकांना इशारा

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR मधल्या घोळांविरोधात सुधारणा करण्यासाठी दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके, अभिजीत दास, आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचप्रमाणे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनाही ताब्यात घेतलं. राहुल गांधी हे मागच्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या सगळ्यांना आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी इशारा दिला आहे. काहीही झालं तरीही राजधानी दिल्लीला वेठीस धरू दिलं जाणार नाही असं रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे.

18:37 (IST) 10 Oct 2026

ऑगस्ट क्रांती मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप; तुषार गांधींसह प्रमुख आंदोलक ताब्यात, कडक बंदोबस्त, वाहतूक वळवली

पोलिसांकडून परवानगी नाकारल्यानंतर ग्रँड रोड व ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी स्थानबद्ध ...अधिक वाचा
18:29 (IST) 10 Oct 2026

"आम्ही तुम्हाला चहूबाजूंनी घेरलंय, अटक करा", 'त्या' पाच जणांची नावं घेत राहुल गांधींचा संताप; तरुणांना पाठिंबा

Rahul Gandhi Youth Protest Support update : दिल्लीत तरुणांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळावर आणि पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...वाचा सविस्तर
18:29 (IST) 10 Oct 2026

"...तर मी पुन्हा उपोषणाला बसेन", आंदोलकांना ताब्यात घेतल्याने सोनम वांगचुक यांचा सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम

CJP Protest Sonam Wangchuk Hunger Strike update : दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याने सोनम वांगचूक यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. ...सविस्तर वाचा
18:03 (IST) 10 Oct 2026

‘Undeclared Emer-GenZ’, शशी थरूर यांच्या शब्दकोशातील नवा शब्द; केंद्र सरकारवर घणाघाती टीका

Shashi Tharoor on Delhi protest security: दिल्लीतील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेवरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...सविस्तर वाचा
17:59 (IST) 10 Oct 2026

CJP च्या जंतर-मंतर आंदोलनाचे नवे प्रमुख, 'आप'चे माजी कार्यकर्ते; अलिबागचे अजिंक्य शिंदे नेमके कोण आहेत?

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अलिबागचे अजिंक्य शिंदे आता जंतर-मंतर आंदोलनाचे नवे प्रमुख बनले आहेत. ...सविस्तर वाचा
17:51 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live Updates: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार

केंद्र सरकारने आज सीजेपीचे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपून टाकल्यानंतर सीजेपीचे पदाधिकारी अजिंक्य शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला.

अजिंक्य शिंदे म्हणाले, "गेल्या वेळी आंदोलन झाले तेव्हा देशाने एकत्र येऊन मोदी-शाहांच्या गर्वाचे हरण केले. याहीवेळी तसे होऊ नये, त्यामुळे त्यांनी दिल्लीत ट्रेन, मेट्रो, रस्ते असे सगळेच अडवले. हवा, पाणी सोडून त्यांनी सगळेच अडवले. सरकार घाबरले, हा आंदोलनाचा विजय आहे. आज कितीही लोकांना ताब्यात घ्या, आम्ही उद्या पुन्हा येऊन आंदोलन करू. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील."

17:46 (IST) 10 Oct 2026

Mumbai CJP Protest Live Updates: मुंबईत आंदोलन करत असताना बॉलिवूड अभिनेते इम्रान खान यांना ताब्यात घेण्यात आले

बॉलिवडूचे अभिनेते इम्रान खान यांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता मुंबई पोलिसांनी त्यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

https://twitter.com/ANI/status/2108892942052237720

16:53 (IST) 10 Oct 2026
Abhijeet Dipke News Live: आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपकेंना गावी जाण्याची मुभा; मानवतावादी दृष्टीकोनातून दिल्ली पोलिसांचा निर्णय

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके (वय ८५) यांचे अल्पशा आजारामुळे शनिवारी सकाळी झाले. यानंतर काही तासांनी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, मानवतावादी दृष्टीकोनातून अभिजीत दिपके यांना त्यांच्या गावी प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. आजीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर ती लगेचच दिपके यांना सांगण्यात आली. तसेच अंत्यविधी कधी होणार आहे, हेही त्यांना सांगण्यात आले.

त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सकाळी दहा वाजता अंत्यविधी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अभिजीतचे आई-वडील छत्रपती संभाजीनगर येथून संतुक पिंपरीकडे दुपारी रवाना झाले असल्याचे दीपके यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/2108874266699767817

16:42 (IST) 10 Oct 2026

"तुम्ही कधीपर्यंत नदीला थांबवणार आहात?" दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेण्यावरून अभिनेते प्रकाश राज यांचा थेट सवाल

Prakash Raj reacts to Delhi protesters detention : "तुम्ही कधीपर्यंत नदीला थांबवणार आहात?" असा सवाल करत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी दिल्लीत शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांना आणि वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर बातमी
16:00 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live Updates: डाव्या संघटनांचा पोलिसांना चकवा; जंतर-मंतर सोडून सफदरजंग पूर, दिल्ली हाट परिसरात आंदोलन

जंतर-मंतर येथे आंदोलक येऊ नयेत म्हणून पोलीस आणि सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र डाव्या संघटना आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली हाट आणि सफदरजंग पुलाला जंतर-मंतर बनवले आणि तिथे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

https://twitter.com/neha_aisa/status/2108846757408804960

https://twitter.com/neha_aisa/status/2108832282308149388

15:55 (IST) 10 Oct 2026

"जिथं पोलीस अडवतील तिथंच जंतर मंतर तयार करा", CJP च्या नव्या नेतृत्त्वाकडून आवाहन; दिपकेंना ताब्यात घेतल्याने अजिंक्य शिंदे आक्रमक

CJP Ajinkya Shinde calls for Jantar Mantar protests : "जिथं पोलीस अडवतील, तिथंच दुसरं जंतर मंतर तयार करा," असं आक्रमक आवाहन कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) नव्या नेतृत्त्वाने म्हणजेच अजिंक्य शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ...अधिक वाचा
15:54 (IST) 10 Oct 2026

मोदी आणि शाह जोडीच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही; सिजेपी आंदोलनावरून राज ठाकरे यांचा भाजपला इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीत पुकारलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी केलेल्या बाळाच्या वापरावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...सविस्तर वाचा
15:27 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live Updates: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2108852358457516051

15:03 (IST) 10 Oct 2026

Video: अभिजीत दिपकेंच्या अनुपस्थितीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा मराठी माणसाकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत होणाऱ्या आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...सविस्तर बातमी
14:42 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live: आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह तृणमूलच्या इतर नेत्यांनाही ताब्यात घेतले गेले.

https://twitter.com/ians_india/status/2108845357404950710

14:34 (IST) 10 Oct 2026

CJP संस्थापक अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे हिंगोलीतील संतुक पिंपरी गावात निधन झाले आहे. दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या अभिजीत दिपके यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...अधिक वाचा
14:34 (IST) 10 Oct 2026

CJP संस्थापक अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे हिंगोलीतील संतुक पिंपरी गावात निधन झाले आहे. दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या अभिजीत दिपके यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...अधिक वाचा
14:22 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live: सीजेपीच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार? आणखी एक मराठी चेहरा आला पुढे

सीजेपीचे संस्थापक आणि सहसंयोजक दिपके, दास आणि रांका यांना अटक होताच आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सीजेपीने आधीच आपले नियोजन केले होते. अभिजीत दिपके यांनी यापूर्वी रेकॉर्ड करून ठेवलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आम्हाला अटक झाल्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करतील, असे जाहीर केले होते. कॉक्रोच जनता पक्षाच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

https://twitter.com/Cockroachisback/status/2108822113800818870

14:02 (IST) 10 Oct 2026
CJP Abhijeet Dipke's Grandmother Passes Away: अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन; आंदोलनादरम्यान कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपके दिल्लीला पोहोचले असता त्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावातील दिपकेंच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

https://twitter.com/ians_india/status/2108828986919072220

13:19 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live: जंतर-मंतर सोडून डाव्या संघटनांचे दिल्लीतील भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन

नेहा बोरा यांची आयसा आणि इतर डाव्या संघटनांनी जंतर-मंतरची वाट सोडून थेट दिल्लीतील भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जंतर-मंतरवरील रस्त्यांवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावल्यामुळे डाव्या संघटनांचे कार्यकर्ते भाजपा मुख्यालयाबाहेर पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र काहीच वेळेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

https://twitter.com/ANI/status/2108820975307596133

12:57 (IST) 10 Oct 2026

राहुल गांधींची खास पोस्ट, म्हणाले; मोदी सरकार जाणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांनी सूचक पोस्ट लिहून ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकार जाणार असल्याचं सांगितलं. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत आंदोलन केलं. राहुल गांधींनी २००४ आणि २०१४ मधील बदलांवर भाष्य केलं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलं.

12:53 (IST) 10 Oct 2026
Tushar Gandhi arrested Live Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

महात्मा गांधींचे पणतू आणि कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात जात असताना नॅशनल कॉलेजजवळ अटक करण्यात आली, अशी माहिती त्यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली.

https://twitter.com/mayuganapatye/status/2108806181129191896

https://twitter.com/TusharG/status/2108792338491580439

12:45 (IST) 10 Oct 2026

अभिजीत दिपकेना विमानातच घेण्यात आलं ताब्यात

अभिजीत दिपकेंनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत माहिती देत ते म्हणाले, दिल्ली पोलीस रांगेत उभे आहेत, आम्हाला विमानाच्या आतूनच ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो आहे. आमच्या विमानात दिल्ली पोलीस येत आहेत असं म्हणत अभिजीत दिपकेने एक इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. ही नरेंद्र मोदींची भीती आहे, ३० वर्षांच्या मुलांना हे विमानातून उचलत आहेत. अशी गोष्ट तर इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेल्या आणीबाणी दरम्यानही केली नव्हती. ३० वर्षांच्या मुलांना हे सरकार घाबरलं आहे. इतर प्रवाशांनाही अडथळा केला जातो आहे. आम्हाला विमानातून अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस आले आहेत. या आणि आम्हाला अटक करा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. तसंच इन्कलाब जिंदाबादच्या घोषणाही दिल्या आहेत.

12:37 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live: 'हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर', अरविंद केजरीवाल यांची टीका

सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्याप्रकारे आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. त्यावरून आता अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर टीका केली आहे. हे आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याचे ते म्हणाले, "मोदींच्या राजवटीमध्ये आपण हुकूमशाहीमध्ये जगत आहोत. विमानातून सीजेपीच्या नेत्यांना अटक करणे हे भीतीचे लक्षण आहे. मोदींनी मतचोरीच्या जोरावर निवडणूक जिंकली हे आता स्पष्ट होत आहे."

12:30 (IST) 10 Oct 2026

CJP Jantar Mantar Protest Live: सर्वोच्च न्यायालयातून १०० वकील पोलिसांच्या ताब्यात, सरन्यायाधीशांनी दिले थेट आदेश

सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली न्यायालयातून १०० हून अधिक महिला आणि पुरूष वकिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला वकिलांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर सरन्यायाधीशांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत वकिलांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2108796171573703020

12:09 (IST) 10 Oct 2026

Abhijeet Dipke, CJP leaders Detained Live Updates: अभिजीत दिपकेंच्या अटकेचा सुप्रिया सुळेंनी केला निषेध

अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारने आपली भेकड वृत्ती दाखवली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली.

Gyanesh Kumar Resignation Demand INDIA Alliance Protest | Opposition Leaders Protest at Vijay Chowk Rashtrapati Bhavan | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा मागणी | इंडिया आघाडी खासदार राष्ट्रपती भवन विजय चौक आंदोलन

राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. (PC:X-Mallikarjun Kharge)