दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने चलो संसद म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसंच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी या आंदोलनातल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या गीतांजली आंगमो?

शिक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून आंदोलन उभं करावं लागतं आहे ही बाब दुर्दैवी आहे. शिवाय प्रत्येक गोष्ट दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एवढंच सगळं काही घडलंच नसतं. सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या. पण अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं जातं आहे दडपशाही सुरु आहे खरोखर दुर्दैवी स्थिती आली आहे. नीटच्या पेपरफुटीनंतर हे कॉक्रोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि २८ जून पासून बेमुदत उपोषण सुरु केलं. आता त्यांच्या पत्नी गीतांजली यादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या असून सरकार दपडशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा ३१ वा दिवस

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाटी दिल्लीत सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज ३१ वा दिवस आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) संसदेवर मोर्चा काढायचे ठरवले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलकांना जागेवरच रोखून धरले आहे. जंतरमंतरवरुन एकाही आंदोलकाला बाहेर पडू देण्यात आलं नव्हतं. मात्र, देशभरातून जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेकजण दिल्लीत येत आहेत. यापैकी आंदोलकांचा एक गट थेट संसद भवनाच्या दिशेने गेला. त्यामुळे सध्या संसदेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले नसले तरी तिथून काही अंतरावरच आहेत. त्यामुळे संसद भवनातील पूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रू धुराचा वापर

जंतर मंतरवर आणि त्यानतंर संसदेच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसेच, अश्रूधुरांचा देखील वापर करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले असून, याचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. अभिजीत दिपके यांच्यासह सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. वांगचुक यांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी रुग्णालयाकडे मागणी केली आहे. यासह आम आदमी पक्षाचे नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.