CJP Parliament March Updates : नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने केलेलं आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. गावा-गावांत, नाक्यांवर, सोशल मीडियावर या आंदोलनाला प्रचंड समर्थन मिळतंय. काल संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचारही अवघ्या देशाने पाहिला, त्यामुळे या आंदोलनाला अधिक धार आली. दरम्यान, हा मोर्चा आजही निघणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलंय. सुरक्षा दलांनी काल आंदोलकांवर निष्ठूर लाठीमार केला, यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यामुळे आंदोलक अधिक पेटून उठले आहेत. आजही देशभरातून समर्थक दिल्लीत दाखल होत आहेत. काल झालेल्या हिंसाचारप्रकरणी काही आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर, आज जंतर-मंतरवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज दिवसभरात काय घडामोडी होतात, याचे अपडेट्स पाहुयात.

Live Updates

CJP Parliament Protest : संसद मोर्चातील ताजे अपडेट्स जाणून घ्या

21:45 (IST) 21 Jul 2026

पहाटे २:४५ वाजता पोलिसांची नोटीस; मुंबईत ९०० 'नीट' आंदोलक विद्यार्थ्यांवर FIR, विद्यार्थी संघटना आक्रमक!

विद्यार्थी संघटनांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत, हा तरुणांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...अधिक वाचा
21:33 (IST) 21 Jul 2026

‘राहुल गांधींची मागणी काही मिनिटांतच मान्य करण्यात आली, तरीही त्यांनी…’; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काय सांगितलं?

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावरच ठिय्या मांडत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...वाचा सविस्तर
20:08 (IST) 21 Jul 2026

राहुल गांधींचे आंदोलन पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरून; 'आप'च्या नेत्याच्या टिकेमुळे विरोधकांत फूट?

पंतप्रधान निवासाबाहेर काही तास चाललेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलनस्थळावरून हटवले. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 21 Jul 2026

VIDEO: राहुल-प्रियंका गांधींचे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; मोदी-शाहांच्या राजीनाम्याची मागणी

या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. ...सविस्तर बातमी
15:59 (IST) 21 Jul 2026

मिरा रोडसाठी नवे शिधावाटप कार्यालय मंजूर

नवीन कार्यालयांतर्गत ४२ शिधावाटप दुकानांचा समावेश; २४ नियमित पदांसह कर्मचारी भरतीला मंजुरी ...अधिक वाचा
15:34 (IST) 21 Jul 2026

जंतरमंतरवर राजकीय नेत्यांच्या गाठीभेट वाढल्या, राहुल गांधी आणि शरद पवार मैदानात

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात आत राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. तसंच, शरज पवारही आंदोलनाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी जंतर-मंतरच्या दिशेने रवाना झाले असून शरद पवारही आज जंतर-मंतरवर भेट देणार आहेत.

15:19 (IST) 21 Jul 2026

म्हाडाच्या मुंबई मंडळाची १७६ घरे तटरक्षक दलाला मिळण्याची शक्यता, म्हाडा मुंबई मंडळ लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

निर्माणाधीन घरे थेट विकली जाणार असल्याने भविष्यातील म्हाडा सोडतीवर परिणाम होण्याची शक्यता; सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नाला फटका? ...वाचा सविस्तर
14:40 (IST) 21 Jul 2026

"सरकारच मानसिक रुग्ण झालंय…"; आंदोलकांवरील लाठीचार्जचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर संताप

Raj Thackeray Post On CJP Parliament Protest: "हे सरकार मानसिक रुग्ण झालं असून पंतप्रधान मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' सोडून रस्त्यावरील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा", अशी मागणी करत त्यांनी मनसेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. ...सविस्तर बातमी
14:05 (IST) 21 Jul 2026

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींसाठी आता म्हाडा सक्षम प्राधिकरण…सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

दक्षिण मुंबईतील १३,८०० उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा तिढा सुटण्यास मदत; २० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी ...वाचा सविस्तर
13:49 (IST) 21 Jul 2026

सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यास उच्च न्यायालयाच्या सूचना

दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं.

https://twitter.com/PTI_News/status/2079479366460027211

13:36 (IST) 21 Jul 2026

दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने गंभीर जखमी झालेली महिला आंदोलक व्हेटिंलेटरवर

दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने गंभीर जखमी झालेली महिला आंदोलक व्हेटिंलेटरवर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2079476539062956158

13:09 (IST) 21 Jul 2026

Devendra Fadnavis On Delhi Protet : "दिल्लीतील आंदोलनात स्वार्थी मंडळी घुसली", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

दिल्लीतील 'नीट' (NEET) पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...सविस्तर बातमी
13:09 (IST) 21 Jul 2026

LIVE : आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी आरएमएल रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा हे आंदोलनादरम्यान सोमवारी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात दाखल झाले.

13:02 (IST) 21 Jul 2026

मला मारा म्हणणारा नागपूरचा आंदोलनकर्ता म्हणाला, "लोकशाही संपली, जिवंत ठेवण्यापेक्षा मला थेट गोळी घाला, मी हिंदू असूनही माझ्यावर…"

दिल्लीतील जंतर-मंतरवर पेपरफुटीप्रकरणी आयोजित संसद मार्चदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...सविस्तर बातमी
13:01 (IST) 21 Jul 2026

"आंदोलनात काहीजण स्वतःचा अजेंडा घेऊन शिरले", संसद मोर्चाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची चर्चा; म्हणाले, "खोलात गेलो तर..."

Devendra Fadnavis Parliament Morcha statement : दिल्लीतील संसद मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात काही लोकांनी स्वतःचा राजकीय अजेंडा घेऊन प्रवेश केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
12:59 (IST) 21 Jul 2026

बाजारात तांब्याचे भाव वाढल्याने रोहीत्रातील साहीत्यावर चोरट्यांचे लक्ष्य

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; ४ आरोपींना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी. ...सविस्तर वाचा
12:19 (IST) 21 Jul 2026

दिल्ली पोलिसांवर अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप

दिल्लीत सोमवारी देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी आहे. या जखमी आंदोलकांशी आज अभिजीत दिपके यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमवारी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. तसंच त्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

सविस्तर वाचा- "दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्या"; अभिजीत दिपकेंचा आरोप

11:59 (IST) 21 Jul 2026

वृक्ष संवर्धनासाठी ‘एसओपी’ तज्ज्ञांच्या कारणमीमांसेनंतर महापालिकेची नवी कार्यपद्धती

आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि वृक्षतज्ज्ञांच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा; मार्च-एप्रिलमध्येच होणार मान्सूनपूर्व शास्त्रीय छाटणी ...अधिक वाचा
11:47 (IST) 21 Jul 2026

LIVE : तारीख उलटून गेलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांनी फोडल्या? आंदोलनातील 'तो' VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका आंदोलकाने दावा केला आहे की पोलिसांनी ज्या अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्याची तारीख उलटून गेली होती. डिसेंबर २०२५ मध्येच हे एक्स्पायर झालं होतं.

https://twitter.com/swanaamdhaanya/status/2079286129774194822

11:40 (IST) 21 Jul 2026

राज्याच्या ‘या’ प्रदेशात आज मुसळधार, तर उर्वरित भागात कोरडे हवामान; आज ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’ कुठे ?

मुंबई, ठाणे, रायगडसह पुण्याच्या घाट माथ्याला 'ऑरेंज अलर्ट'; पालघर, नाशिक आणि साताऱ्यात 'यलो अलर्ट' जारी ...वाचा सविस्तर
11:37 (IST) 21 Jul 2026

LIVE : पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा गोंधळ, राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

11:22 (IST) 21 Jul 2026

वीज पुरवठा खंडित, फोन जॅमर बसवले! मध्यरात्री जंतर-मंतरवर आंदोलक आक्रमक; तरुणाई आजही संसदेवर धडकणार?

CJP Parliament March updates NEET पेपर लीक आणि शैक्षणिक घोटाळ्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेला सीजेपीचा 'संसद चलो' मोर्चा आजही सुरुच राहणार असल्याचा इशारा संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.: ...अधिक वाचा
11:19 (IST) 21 Jul 2026

Video : जंतरमंतरवरील आंदोलन आणि नगराध्यक्षांच्या घोषणांनी दिल्ली दणाणली; वर्धेकरांचा लक्षवेधी आवाज

दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता थेट वर्ध्यापर्यंत पोहोचली आहे. ...सविस्तर वाचा
11:15 (IST) 21 Jul 2026

गणेशोत्सवत कोकणातील रेल्वेगाड्यांचे तिकिट मिळेना ; बहुतांश रेल्वेगाड्या रिग्रेट यादीत

दलाल आणि ऑटो-फिल सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याचा प्रवाशांना संशय; रेल्वेकडून यंदा ११० गुन्हे दाखल ...वाचा सविस्तर
11:15 (IST) 21 Jul 2026

LIVE: दिल्ली पोलिसांकडून ५ एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कनॉट प्लेस पोलीस स्टेशन, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये ५ एफआयआर दाखल केले आहेत. आणखी एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे - दिल्ली पोलीस.

11:12 (IST) 21 Jul 2026

LIVE : सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेची नासधुस; पोलिसांकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल

संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी एक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. हिंसाचारासाठी कट रचल्याप्रकरणी एक एफआयआर नोंदवण्यात आला असून, पोलिस तपासात यादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे या प्रकरणांमध्ये दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३, शस्त्र कायदा, १९५९ (Arms Act) आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा (PDPP Act) च्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कलम २२३(ब) BNS – लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे किंवा सरकारी कामात अडथळा आणणे.

एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, आरोपींनी बेकायदेशीरपणे एकत्र येऊन सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत केली, सरकारी कामात अडथळा आणला, हिंसक कारवाया केल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या सर्व आरोपांचा तपास पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याकडून भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि PDPP कायद्याच्या तरतुदींनुसार केला जात आहे.

https://twitter.com/ANI/status/2079430808327295275?s=20

11:10 (IST) 21 Jul 2026

संसद मोर्चातील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया काय? NDA ची बैठक संपल्यानंतर किरण रिजीजू म्हणाले…

PM Modi Parliament March violence reaction : दिल्लीत संसदेवरील मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA तील बैठकीत भूमिका स्पष्ट केली आहे. ...सविस्तर वाचा
11:03 (IST) 21 Jul 2026

एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी ; गट आरक्षणासाठी जादा दर आकारणी

रेल्वे वेटिंगमुळे गट आरक्षणावर भर देणाऱ्या मंडळांना आणि कुटुंबांना बसणार अतिरिक्त आर्थिक फटका ...अधिक वाचा
10:49 (IST) 21 Jul 2026

LIVE : पोलिसांकडून ५ आंदोलकांवर गुन्हे दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे शोधणार आंदोलक

दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कनॉट प्लेस पोलीस स्टेशन, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये ५ एफआयआर दाखल केले आहेत. आणखी एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे - दिल्ली पोलीस

https://twitter.com/ANI/status/2079421562990833963?s=20

10:47 (IST) 21 Jul 2026

पहिला विवाह लपवणे महिलेला महागात ; उच्च न्यायालयाने पोटगी नाकारली

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम; महिलेची याचिका फेटाळली, मात्र अल्पवयीन मुलाचा देखभाल खर्च राहणार सुरू ...अधिक वाचा

cjp parliament march abhijeet dipke apology | delhi jantar mantar protest abhijeet dipke statement | सीजेपी संसदेवर मोर्चा अभिजित दीपके माफी विधान | जंतर मंतर आंदोलन दिल्ली अभिजित दीपके आवाहन

सीजेपी मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजित दीपके यांचं आवाहन (इंडियन एक्स्प्रेस फोटो)

CJP Parliament Protest : संसद मोर्चातील ताजे अपडेट्स जाणून घ्या